नक्षलवाद्यांनी ड्रोन किंवा काहीही वापरू द्या, आमच्याकडेही अत्याधुनिक शस्र, गृहमंत्र्यांचा इशारा

आमच्या पोलिसांकडे अत्याधुनिक शस्र आहेत, असा इशाराही अनिल देशमुखांनी दिला. (Anil deshmukh on Five Naxalites killed in Gadchiroli)

नक्षलवाद्यांनी ड्रोन किंवा काहीही वापरू द्या, आमच्याकडेही अत्याधुनिक शस्र, गृहमंत्र्यांचा इशारा

नागपूर : गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी आमचे पोलीस चांगली कामगिरी करत आहेत, अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे कौतुक केले. तसेच नक्षलवाद्यांनी ड्रोन किंवा काहीही वापरू द्या, आमच्या पोलिसांकडे अत्याधुनिक शस्र आहेत, असा इशाराही अनिल देशमुखांनी दिला. (Anil deshmukh on Five Naxalites killed in Gadchiroli)

“गडचिरोली जिल्ह्यात किसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कोसमी-किसनेली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याच्या प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारामध्ये 5 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी 60च्या जवानांना यश आले. या परिसरात नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी आमचे पोलीस चांगली कामगिरी करत आहेत. नक्षलवाद्यांनी ड्रोन किंवा काहीही वापरू द्या, आमच्या पोलीसांकडे अत्याधुनिक शस्र आहेत,” असे अनिल देशमुख म्हणाले.

“नागपूरचं नाव पूर्वी क्राईम कॅपिटल म्हणून ओळखलं जायचं. पण आता आम्ही शहरातील क्राईम कमी करत आहे. नागपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारांचे प्रमाण कमी होत आहे,” असेही अनिल देशमुखांनी सांगितले.

“नागपुरात कोरोना नियंत्रणात आला आहे. पोलीस, जिल्हा प्रशासन आणि मनपान केलेल्या कामामुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र तरीही सर्वांनी मास्क घालणं गरजेचं आहे,” असेही अनिल देशमुख म्हणाले.

रविवारी संध्याकाळी जवळपास चार वाजताच्या सुमारास किसनेलीच्या जंगलात सी -60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. ही चकमक अद्यापही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सी- 60 कमांडोंनी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ही कारवाई केली. या अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं.  मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे.(Anil deshmukh on Five Naxalites killed in Gadchiroli)

संबंधित बातम्या : 

गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा, एकनाथ शिंदेंकडून जवानांचं कौतुक

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सीआरपीएफवर नक्षलवादी हल्ला, 17 जवानांना वीरमरण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *