महापरिनिर्वाण दिनी वंचितकडून रक्तदान शिबिराचं आयोजन, बाबासाहेबांना अनोखी आदरांजली

| Updated on: Dec 06, 2020 | 5:23 PM

वंचितने रक्तदान शिबिराचं आयोजन करुन बाबासाहेबांना आदरांजली अर्पित केली. (Honoring Babasaheb by organizing blood donation camp VBA Ambarnath)

महापरिनिर्वाण दिनी वंचितकडून रक्तदान शिबिराचं आयोजन, बाबासाहेबांना अनोखी आदरांजली
Follow us on

अंबरनाथ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (रविवार) 64 वा महापरिनिर्वाण दिन. भीम अनुयायी विविध प्रकारे बाबासाहेबांना आजच्या दिवशी आदरांजली वाहत आहेत. अंबरनाथमध्ये वंचितकडून बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. वंचितने रक्तदान शिबिराचं आयोजन करुन बाबासाहेबांना आदरांजली अर्पित केली. (Honoring Babasaheb by organizing blood donation camp VBA Ambarnath)

दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी जमतात. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चैत्यभूमीवर अनुयायांनी येऊ नये असं आवाहन करण्यात आलं. त्यामुळे बाबासाहेबांना घरी आणि आपापल्या परिसरातील बुद्ध विहारात अभिवादन करण्यात आलं. वंचित बहुजन आघाडीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं.

अंबरनाथ वंचित बहुजन आघाडीचे  शहराध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी हे शिबीर आयोजित केलं होतं. अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर भागातील आम्रपाली बुद्ध विहारात हे शिबीर पार पडलं. यावेळी अनेक जणांनी रक्तदान केलं.

कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून रक्तदान करण्याचं आवाहन केलं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच सरकारमधील अनेक मंत्र्यांनी राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावं, असं आवाहन करत आहेत. त्याच अनुषंगाने बाबासाहेबांना अभिवादन म्हणून हे शिबीर आयोजित केल्याचं प्रवीण गोसावी यांनी सांगितलं.

सर्वपक्षीय नेत्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. दादरमध्ये असलेल्या चैत्यभूमीवर शासकिय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यपाल भरगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर चैत्यभूमीवर उपस्थित होते. चैत्यभूमी परिसरात गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला. दादरमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केली गेली. यावेळी 14 एप्रिल 2023 ला बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण होईल, अशी घोषणा यावेळी सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

(Honoring Babasaheb by organizing blood donation camp VBA Ambarnath)

संबंधित बातम्या

Dr. Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन, सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिवादन

PHOTOS: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन; मुख्यमंत्री ते राज्यपालांकडून अभिवादन