Supriya Sule: तपास यंत्रणांच्या संभाव्य कारवायांची माहिती भाजपवाल्यांना कशी मिळते?; सुप्रिया सुळे शहांना जाब विचारणार

Supriya Sule: भाजपवाल्यांनी रोज उठायचं, घोटाळ्यावर बोलायचं ही आजकाल त्यांची फॅशन झाली आहे. मला त्या आरोपांची गंमत वाटते. मुख्यमंत्र्यावर 19 बंगल्याचे आरोप करण्यात आले.

Supriya Sule: तपास यंत्रणांच्या संभाव्य कारवायांची माहिती भाजपवाल्यांना कशी मिळते?; सुप्रिया सुळे शहांना जाब विचारणार
तपास यंत्रणांच्या संभाव्य कारवायांची माहिती भाजपवाल्यांना कशी मिळते?; सुप्रिया सुळे शहांना जाब विचारणारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 5:41 PM

उस्मानाबाद: तपास यंत्रणांची धाड पडण्यााधीच त्याची माहिती भाजप (bjp) नेत्यांना कशी मिळते असा सवाल गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने भाजपला हा सवाल केला जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांना हा सवाल करणार आहेत. केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत आहे. केंद्र सरकार अन्याय करत आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना कारण नसताना आत टाकण्यात आले. अनिल परबांनी परवा सर्व आरोपांचे उत्तर दिलं आहे. सीबीआय ही संस्था स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कारवायांची माहिती दोन दिवसाआधी भाजपवाल्यांना कशी काय मिळते? मी हे गृहमंत्री अमित शहांना संसदेत विचारणार आहे, असं सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे या उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता हा सवाल केला.

भाजपवाल्यांनी रोज उठायचं, घोटाळ्यावर बोलायचं ही आजकाल त्यांची फॅशन झाली आहे. मला त्या आरोपांची गंमत वाटते. मुख्यमंत्र्यावर 19 बंगल्याचे आरोप करण्यात आले. मात्र एकही बंगला निघाला नाही. त्यामुळे कोण आरोप करतंय, आरोप करणाऱ्याची विश्वासहार्ता किती आहे. हे पण पाहणे महत्वाचे आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना लगावला.

हे सुद्धा वाचा

त्या विषयावर पडदा टाकूया

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं वादग्रस्त विधानमागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांतदादांनी जर दिलगीरी व्यक्त केली असेल तर नक्कीच त्यांचं मन मोठं आहे. त्यामुळे आता सगळे आपण या विषयावर पडदा टाकूयात, असं त्या म्हणाल्या.

मंदिराचा विषय सोडा, विकासा कामावर बोला

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही टोला लगावला. तुम्ही हा मंदिराचा विषय सोडा आणि आमच्या सरकारला विकासांच्या कामावर धारेवर धरा. त्यांना तुम्ही पाणी, रस्ते यावर विचारा, असा टोलाही त्यांनी लगावला.

पद्मसिंह पाटलांचा सार्थ अभिमान

शरद पवार आणि पद्मसिंह पाटलांचे 55 वर्षाचे नाते आहे. त्यामुळे फक्त मतं आणि राजकारण यावरच नातं नसतं. आजही आम्हा सर्वांना पद्मसिंह पाटलांचा सार्थ आभिमान आहे. त्यामुळे राजकारणात वेगळे असलो तरी आमचे नाते संबध घट्ट आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

पवारांकडून मंदिराला तीन लाख

काल पोखरनीला मी दर्शनाला गेले होतेय. दर्शन करून निघतांना तेथील व्यवस्थापकाने मला शरद पवारांचा एक किस्सा सांगितला. पवार साहेब मुख्यमंत्री आसतांना 1993 ला या मंदिरात आले होते. त्यांनी त्यावेळी या मंदिरासाठी 3 लाख रुपये दिले होते, असं या व्यवस्थापकाने सांगितलं. त्यामुळे पवार साहेंबावर आरोप करणाऱ्यांचा अभ्यास कमी आहे हे लक्षात येते, असा चिमटाही त्यांनी राज ठाकरे यांना काढला.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.