बिबट्याच्या हल्ल्यातून वाचायचं कसं? वापरा ही सर्वात सोपी ट्रीक, तुम्हाला माहिती आहे का?

महाराष्ट्रात बिबट्यांनी धुमाकुळ घातला आहे, सध्या राज्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत, सध्या लोकांमध्ये त्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यातून वाचायचं कसं? वापरा ही सर्वात सोपी ट्रीक, तुम्हाला माहिती आहे का?
बिबट्या
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2025 | 9:16 PM

महाराष्ट्रात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे, राज्यात बिबट्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भर वस्तीत बिबट्या शिरल्याची घटना घडली होती. या घटनेनं शहरात मोठी दहशत निर्माण झाली, अथक प्रयत्नानंतर अखेर वनविभागानं हा बिबट्या जेरबंद केला. या घटनेत एका वनविभागाच्या अधिकाऱ्याला देखील दुखापत झाली असल्याचं समोर आलं होतं.  सध्या बिबट्या नागरी वस्त्यांकडे धाव घेत असल्याचं दिसून येत आहे, अनेकदा तो आपली शिकार समजून माणसांवर हल्ले करत आहे, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. विशेष: ग्रामीण भागांमध्ये घरासमोर खेळत असलेल्या लहान मुलांना या बिबट्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

सध्या उसतोडणीचा हंगाम सुरू आहे, आणि सर्वत्र वाढलेले उसाचं पीक हे बिबट्याच्या लपण्याची महत्त्वाची जागा आहे. दरम्यान यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे, अनेकदा उसतोडणीसाठी आलेल्या मजुरांवर बिबट्याकडून हल्ला होतो. दरम्यान आज आपण बिबट्यापासून स्वत:चा बचाव कसा करू शकतो? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

बिबट्यापासून बचाव कसा करायचा? 

जर तुम्हाला तुमच्या आजूबाजुला बिबट्या दिसला तर सर्वात आधी घाबरून जाऊ नका, तुम्ही जर घाबरला तर बिबट्याला तुमच्यावर हल्ला करणं आणखी सोप होणार आहे, हे लक्षात ठेवा. बिबट्या दिसल्यास पळू देखील नका कारण बिबट्या हा तुमच्यापेक्षा जोरात पळू शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्या दिशेनं बिबट्या येताना दिसला तर हात वर करून जोरजोरात ओरडला, त्यामुळे समोर असलेला प्राणी हा आपल्या पेक्षा मोठा आहे, असा बिबट्याचा समज होतो आणि तो तुमच्यापासून दूर निघून जाईल. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे तुम्हाला जर कधी बिबट्या दिसला तर खाली वाकू किंवा बसू नका, त्यामुळे समरो दिसत असलेला प्राणी हा आपल्यापेक्षा लहान आहे, असा त्याचा समज होऊ शकतो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा जीव बिबट्यापासून वाचू शकता.

डिस्क्लेमर : वरील माहती ही उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, माहिती देणं एवढाच याचा उद्देश आहे, या माहितीला टीव्ही 9 मराठी कोणताही दुजोरा देत नाही.