
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला, राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. राज्यात महायुतीच्या तब्बल 232 जागा निवडणूक आल्या तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. दरम्यान आता राज्यात सत्तेमध्ये येऊन महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्तानं सी व्होटरच्या वतीनं एक सर्व्हे करण्यात आला आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षभरात सरकारची कामगिरी कशी राहिली? लोकांना महायुतीच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? लोकांना सरकारबद्दल काय वाटतं? अशा अनेक प्रशांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सी व्होटरच्या सर्व्हेत लोकांचा कल काय? आहे? सी-व्होटर्सचा ‘मूड ऑफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचं प्रसारण शुक्रवारी रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान टीव्ही 9 मराठीवर करण्यात येणार आहे. या सर्व्हेत सरकारची कामगिरी कशी? देवेंद्र फडणवीस सरकार बद्दल जनता समाधानी आहे का? महाराष्ट्राचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती? राज्यातल्या बेरोजगारीच्या प्रश्नावर जनतेला काय वाटतं? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी केलेल्या C-Voter मूड ऑफ महाराष्ट्र सर्वेक्षणात खालील मुद्द्यांवर सार्वजनिक मत जाणून घेण्याची शक्यता आहे:
१. जनसंतोष:
राज्याच्या शासनपद्धतीबद्दल, धोरणांबद्दल आणि एकूण प्रगतीबद्दल नागरिक किती समाधानी आहेत?
२. राजकीय नेतृत्व:
मुख्यमंत्री तसेच इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या कामगिरीविषयी जनतेच्या अपेक्षा आणि त्यांच्या मानांकनाचे स्तर.
३. आर्थिक परिणाम:
सरकारच्या धोरणांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर, रोजगारावर आणि स्थानिक व्यवसायांवर कसा परिणाम झाला आहे?
४. सामाजिक कल्याण:
वंचित आणि दुर्बल गटांसाठी राबविलेल्या सामाजिक आणि शासकीय योजनांची प्रभावीता.
५. कायदा आणि सुव्यवस्था:
राज्यातील सुरक्षिततेबद्दल, पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेबद्दल आणि कायदा-सुव्यवस्था स्थितीबद्दल नागरिकांचे मत.
६. आरोग्य आणि शिक्षण:
सार्वजनिक आरोग्य सुविधा, आरोग्य सेवा सुधारणा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासात्मक उपाययोजनांचे मूल्यमापन.
७. पायाभूत विकास:
रस्ते बांधकाम, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांच्या प्रगतीबद्दलचे नागरिकांचे समाधान.
उद्या दिनांक ५ डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 ते 10 या वेळेत C-Voter मूड ऑफ महाराष्ट्र जाहीर होणार आहे. टीव्ही9 मराठी चॅनेलवर सरकारच्या कारभाराचा हा सर्व्हे दाखवण्यात येणार आहे.