
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपला 89 आणि शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधुंना 71 आणि काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता महायुतीचा महापौर होणार आहे. या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. मात्र या युतीचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या निकालावर भाष्य केले आहे.
मुंबई महापालिकेच्या निकालावर बोलताना आणि मुंबईच्या महापौर पदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मुंबईमध्ये आमची महापौर होणार आणि व्हावा अशी आमची इच्छा होती आणि आजही आहे. तो आकडा आज तरी आम्ही गाठू शकलेलो नाही. मात्र जो निकाल लागला आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडला आहे. आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर ते होईल.’
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा आमदार विश्वजीत कदमांनी केला सत्कार
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
पुढे बोतलाना उद्धव ठाकरेंनी, ‘मला मुंबईकरांकडून आणखी अपेक्षा नक्कीच होती. 25 वर्षे आम्ही जी काही सेवा केली, सुधारणा केल्या, त्या आम्ही सर्वांसमोर ठेवलेल्या होत्या. कोविड काळात जे काही काम केले त्या मुंबई मॉडेलची जगभरात प्रशंसा झाली. हे सगळं पाहिल्यानंतर असं आम्हाला वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील. आता मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद जरी दिले नसले तरी जे दिलेत ते भरपूर दिले आहेत असं विधान केले आहे.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मतदारांचे आभार मानले. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाहीत हे कालच्या मुंबई महापालिकेच्या आणि राज्यातील इतर निकालांनी दाखवून दिलं आहे. भारतीय जनता पक्ष हा कागदावरती आहे, पण जमिनीवरती नाहीये. तो जर जमिनीवर असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते. त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती. यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता. नियम बदलावे लागले नसते.’