Inside story : उद्धव, राज ठाकरे एकत्र आले तर… राज्यात सर्वाधिक फटका कोणत्या पक्षाला बसणार?

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली, ही दोन्ही बंधूंमध्ये पहिलीच राजकीय भेट आहे.

Inside story : उद्धव, राज ठाकरे एकत्र आले तर... राज्यात सर्वाधिक फटका कोणत्या पक्षाला बसणार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2025 | 8:14 PM

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. वरळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंची अनेकदा भेट देखील झाली आहे. दरम्यान बुधवारी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. कौटुंबीक भेटीनंतर ही दोन्ही ठाकरे बंधूंमधील पहिलीच राजकीय भेट होती. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटीसंदर्भात तब्बल सव्वा दोन तास बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित होते.

समोर आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण द्यायला गेले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्याचसोबत येत्या दसरा मेळाव्यात शिवसेना आणि मनसे यांच्या युतीची देखील घोषणा होऊ शकते अशी देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, जर समजा ठाकरे बंधूंची युती झाली तर सर्वात मोठा फटका राज्यात कोणत्या पक्षाला बसू शकतो. जाणून घेऊयात.

काँग्रेसला धक्का

याचा काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, कारण काँग्रेसची उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडी पूर्वीपासूनच आहे, मात्र राज ठाकरे हे कोणतीही भूमिका अधिक आक्रमकपणे मांडणारे नेते आहेत. त्यांनी अनेकदा हिंदुत्त्वाची भूमिका घेतली आहे, मात्र दुसरीकडे काँग्रेसची भूमिका ही धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे काँग्रेसला राज ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये जुळून घेणं तसं आवघड जाऊ शकतं.

एकनाथ शिंदेंचंही टेन्शन वाढणार

एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत, असा दावा केला जातो. मात्र जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर शिवसेना पक्षावर सध्या असलेली एकनाथ शिंदे यांची पकड काही प्रमाणात कमी होऊ शकते. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मतदार देखील एकच आहे, याचा फटका हा शिंदे यांना बसू शकतो.

भाजपला फटका

भाजप हा राज्यात आणि देशातही सर्वात मोठा पक्ष आहे, मात्र जर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा मोठा फटका हा भाजपला मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात महापालिका निवडणुकांना बसू शकतो. कारण शिवसेना आणि भाजपचा मतदार एकच आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट वेगवेगळे लढल्यामुळे मतदाराचं विभाज होतं, मात्र ते जर एकत्र लढले तर मतदान फुटणार नाही, त्याचा फटका हा भाजपला बसू शकतो.