VIDEO : ऐकावं ते नवलच! मुंबईत भारतीय पोशाख परिधान केल्यास चक्क रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही

| Updated on: Oct 18, 2021 | 6:32 PM

मुंबईत वरळी भागात असलेल्या अट्रिया मॉलमधल्या रेस्टॉरंटमध्ये चक्क भारतीय पोशाख परिधान करून तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रवेश नाकारला जातोय. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे ही बाब समोर आलीय. समाज माध्यमांवर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

VIDEO : ऐकावं ते नवलच! मुंबईत भारतीय पोशाख परिधान केल्यास चक्क रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही
atria mall
Follow us on

मुंबईः भारतात सर्वधर्म समभाव असून, स्त्रियासुद्धा आता पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून चालत आहेत. अनेक क्षेत्रात स्त्रियांनी स्वतःला सिद्ध केलंय. पण अजूनही असे काही लोक आहेत ते स्त्री आणि पुरुषांमध्ये भेद करतात. मुंबईतल्या वरळीतल्या एका मॉलमध्येही असाच एक प्रकार समोर आलाय. मुंबईतल्या वरळीतल्या अट्रिया मॉलमधल्या रेस्टॉरंटमध्ये एका महिलेनं भारतीय पोशाख घातल्यानं तिला प्रवेश नाकारण्यात आलाय.

भारतीय पोशाख परिधान करून गेल्यास प्रवेश नाकारला जातोय

मुंबईत वरळी भागात असलेल्या अट्रिया मॉलमधल्या रेस्टॉरंटमध्ये चक्क भारतीय पोशाख परिधान करून तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रवेश नाकारला जातोय. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे ही बाब समोर आलीय. समाज माध्यमांवर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी हिजाब घातल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारलाय

या व्हिडीओमध्ये एक हिजाब (मुस्लिम महिला परिधान करत असलेला पोशाख) परिधान केलेली महिला रेस्टॉरंटमध्ये जाऊ इच्छित असताना तिला या रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी हिजाब घातल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारलाय. आम्ही हिजाब आणि साडी अशा भारतीय पोशाख परिधान केलेल्यांना प्रवेश नाकारत असल्याचं या कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेच्या मित्रांना सांगितल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय.

रेस्टॉरंट चालकांबद्दल तीव्र संताप व्यक्त

वरळीतल्या अट्रिया मॉलमधल्या रेस्टो बार टॅपमध्ये हा प्रकार घडलाय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांवर या रेस्टॉरंट चालकांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय. “भारतासारख्या धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखल्या आणि पुढारलेल्या देशात अशा पद्धतीने सुशिक्षित समाजात जातीय आणि बुरसटलेल्या गोष्टी पाळल्या जातात असतील आणि असे मागासलेले निर्बंध लादले जात असतील तर समाज सुसंस्कृत होण्यास अजून बराच काळ द्यावा लागणार आहे,” अशी प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहे.

इतर बातम्या

VIDEO | नवी मुंबईत चक्क फूटपाथ 10 फूट खाली कोसळला, नाल्यात पडून तरुण जखमी

घराची प्रतीक्षा महागात पडली, किंमत अडीच लाखांनी वाढवली, लाभार्थ्यांचा सिडकोंवर आरोप, नेमकं प्रकरण काय?

If you wear Indian clothes in Mumbai, you will not be allowed to enter the restaurant