VIDEO | नवी मुंबईत चक्क फूटपाथ 10 फूट खाली कोसळला, नाल्यात पडून तरुण जखमी

वाशी सेक्टर 19 येथील 20 मीटर लांब फुटपाथ तब्बल 10 फूट खाली कोसळल्याने एक मोठा अपघात झालाय. रात्री अचानकपणे इतका मोठा फुटपाथ कोसळला. या फुटपाथवरून चालत असलेला एक तरुण आणि फुटपाथवर असलेल्या 2 स्कुटी नाल्यात पडल्या.

VIDEO | नवी मुंबईत चक्क फूटपाथ 10 फूट खाली कोसळला, नाल्यात पडून तरुण जखमी
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 9:10 AM

नवी मुंबई : नवी मुंबईत फूटपाथ कोसळल्यामुळे तरुण जखमी झाल्याची माहिती आहे. तरुणासह दोन स्कूटी नाल्यात पडल्या. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

वाशी सेक्टर 19 येथील 20 मीटर लांब फुटपाथ तब्बल 10 फूट खाली कोसळल्याने एक मोठा अपघात झालाय. रात्री अचानकपणे इतका मोठा फुटपाथ कोसळला. या फुटपाथवरून चालत असलेला एक तरुण आणि फुटपाथवर असलेल्या 2 स्कुटी नाल्यात पडल्या.

तरुण जखमी, स्कूटीचेही नुकसान

यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 2 स्कुटीचे देखील मोठे नुकसान झालेय. इतका मोठा फुटपाथ क्षणात कोसळल्याने या फुटपाथच्या बांधकाम निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहे.

फूटपाथचे बांधकाम निकृष्ट असल्याचा दावा

अतिशय निकृष्ट दर्जाचे कामकाज झाले असल्यानेच ही दुर्घटना घडली असून स्थानिक नागरिकांकडून महापालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ :

कल्याणमध्ये टोइंग व्हॅन ज्वेलरच्या दुकानात घुसली

दुसरीकडे, कल्याणमध्ये टोइंग व्हॅन ज्वेलरच्या दुकानात घुसून विचित्र अपघात घडला होता. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी काही दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचं नुकसान झालं होतं.

कल्याणमधील मोहम्मद अली चौक परिसरात काही महिन्यांपूर्वी हा अपघात घडला होता. ठाणे वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅन चालवत असताना चालकाला अचानक फीट आली. त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं होतं.

रस्त्यावर पार्क दुचाक्यांचं नुकसान

टोइंग व्हॅन फूटपाथच्या कडेला असलेल्या काही बाईक्सना धडकली. त्यानंतर ती थेट राजेंद्र ज्वेलर्सच्या दुकानावर जाऊन आदळली. यामध्ये कोणीही जखमी झालेला नाही, मात्र रस्त्यावर पार्क दुचाक्यांचं नुकसान झालं होतं.

व्हॅन भरधाव वेगाने फूटपाथच्या दिशेने येताना बघ्यांनाही हा नेमका काय प्रकार घडत आहे, हे काही क्षण समजलं नाही. राजेंद्र ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही गोंधळ उडाला. अपघाताची घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.

संबंधित बातम्या :

कल्याणमध्ये टोइंग व्हॅन थेट ज्वेलर्सच्या दुकानात घुसली

मुलीचा अपघात, उपचारासाठी पैसे पाठवा, पिंपरीतील चार नगरसेवकांना गंडा, आरोपीला अटक

सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा प्रकरण, 4 जणांवर गुन्हा

Non Stop LIVE Update
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.