मुलीचा अपघात, उपचारासाठी पैसे पाठवा, पिंपरीतील चार नगरसेवकांना गंडा, आरोपीला अटक

पिंपरी चिंचवडमधील चौघा नगरसेवकांची फसवणूक केल्या प्रकरणी सांगवी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुरज वाघ असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुलीचा अपघात, उपचारासाठी पैसे पाठवा, पिंपरीतील चार नगरसेवकांना गंडा, आरोपीला अटक
पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांची फसवणूक करणारा अटकेत
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 10:03 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेतील चौघा नगरसेवकांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुलीचा अपघात झाल्याचं खोटं सांगत या व्यक्तीने पुण्यातील तब्बल चार नगरसेवकांकडे पैशांची मागणी केली होती. मात्र ही फसवणूक असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नाशिकमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पिंपरी चिंचवडमधील चौघा नगरसेवकांची फसवणूक केल्या प्रकरणी सांगवी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुरज वाघ असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

आपल्या मुलीचा अपघात झाल्याचा बनाव रचत सुरज ती वायसीएम रुग्णालयात दाखल असल्याचं खोटं सांगत असे. उपचारासाठी पैसे द्या, अशी मागणी त्याने चौघा नगरसेवकांना फोन लावून केली होती. त्यानुसार चार नगरसेवकांनी गुगलपे करत सुरजला पैसे पाठवले होते.

चौकशीनंतर बनाव उघड

दरम्यान, सांगवीमधील नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केल्यानंतर असा अपघात झालेली मुलगी रुग्णालयात नसल्याचे लक्षात आली. त्या विरोधात सांगवी पोलिस स्थानकात त्यांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत सुरजला नाशिकमधून अटक केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे,पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे, साहेब पोलीस निरीक्षक सतीश कांबळे,हवालदार चंद्रकांत भिसे,विवेक गायकवाड केंगले,प्रवीण पाटील,विजय मोरे,हेमंत गुट्टीकोंडा,अरुण नराळे यांनी केली

तोतया आयकर अधिकाऱ्याचा सराफाला गंडा

याआधी, भंडारा शहरात तोतया आयकर अधिकाऱ्याने सराफा व्यापाऱ्याला गंडा घातला होता. सोन्याची खरेदीचे ऑनलाईन पैसे पाठवल्याचे बनावट स्क्रीनशॉट दाखवत फसवणूक करण्यात आली होती. फसवणुकीच्या नव्या फंड्यामुळे पोलिससुद्धा अचंबित झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

आयकर अधिकारी असल्याचे सांगत एका भामट्याने भंडाऱ्यातील एका सराफा व्यापाऱ्याला 1 लाख 80 हजार रुपयांनी गंडवले आहे. ही लूट त्याने मोबाईलवरुन ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट दाखवून केली आहे. ही घटना भंडारा येथील अनादिनारायण ज्वेलर्समध्ये घडली. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीच्या नव्या फंड्यामुळे पोलिससुद्धा अचंबित झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

भंडारा येथील मेन लाईनमध्ये कमला हाऊसमध्ये अनादिनारायण ज्वेलर्स आहे. त्यांच्या दुकानात आलेल्या ग्राहकाने आपण आयकर अधिकारी असल्याचे खोटे सांगितले. सोने खरेदी करायचे आहे, असे सांगत त्याने सोन्याची चेन आणि अंगठीची पाहणी केली. सोन्याची चेन आणि दोन अंगठ्या (वजन 27.49 ग्रॅम) खरेदी केल्या.

पैसे पाठवल्याचा खोटा स्क्रीनशॉट

एकूण किमतीपैकी 1 लाख 80 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरुन करण सोनी यांच्या मोबाईलवर पाठवले. पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉटही दाखवण्यात आला. त्यावर विश्वास ठेवून 25.490 ग्रॅम सोन्याची चेन देण्यात आली, तर अंगठ्या रविवारी घेऊन जाईन, असे त्याने सांगितले. खरेदीचे बिलही रविवारीच घेऊन जाईन, असे सांगून तो निघून गेला.

अकाऊंटमध्ये पैसेच ट्रान्सफर नाहीत

काही वेळाने सोनी यांनी आपले अकाऊंट स्टेटमेंट चेक केले असता, त्यात कोणतीच रक्कम जमा झाली नसल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. अखेर रात्री भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. त्यावरुन पोलिसांनी तोतया आयकर अधिकारी संतोष पी. नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भंडारा शहर पोलिस त्याच्या शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या :

सोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा

पुण्यात पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला 1 कोटी 60 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा प्रकरण, 4 जणांवर गुन्हा

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.