IMD Monsoon Update : पावसाचा अलर्ट जारी, तुमच्या भागात या दिवशी धो धो सरी बरसणार, नदी नाले भरून जाणार!

जून महिन्याच्या पहिल्या वीस दिसांत महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सक्रिय होतो. परंतु आता जून महिना संपण्यााला फक्त सात दिवस उरलेले असूनही मोसमी पावसाने राज्य व्यापलेले नाही. जून महिन्यात आतापर्यंत अपेक्षेपेत्रक्षा खूपच कमी पाऊस झाला. एक जून ते आतापर्यंत जो पाऊस झाला आहे त्यामध्ये 70 टक्के तूट आहे.

IMD Monsoon Update : पावसाचा अलर्ट जारी, तुमच्या भागात या दिवशी धो धो सरी बरसणार, नदी नाले भरून जाणार!
RAIN UPDATE IMD MONSOON UPDATE
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 23, 2026 | 6:20 PM

Monsoon Update : यंदा पाऊस खूपच लांबला. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला नाही. 23 जून रोजीपासून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता राज्यात अनेक भागात ढग जमा होत आहेत. काही ठिकाणी तर पावसाच्या सरीदेखील पाहायला मिळाल्या. आता हळूहळू मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात बहुसंख्य भागात आज मान्सून पोहोचलेला आहे. असे असतानाच पुण्यातील हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ एस डी सानप यांनी आगामी दिवसात हवामान कसे राहील, तसेच कोणत्या भागात कसा पाऊस असेल याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पाच ते आठ दिवसांमध्ये राज्यभरात दमदार पाऊस

एस डी सानप यांच्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये आज मान्सून पोहोचला आहे. वर्धा आणि छत्तीसगडमधील बऱ्यापैकी भागातही मान्सून दाखल झाला आहे. झारखंड आणि बिहारपर्यंत सध्या मान्सून पोहोचला आहे. आगामी पाच ते आठ दिवसांमध्ये राज्यभरात दमदार पाऊस पडू शकतो. मान्सून सक्रिय होत आहे आणि बऱ्याच ठिकाणी मान्सूनचा पाऊस पडत आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी पावसाची चांगल्या पद्धतीने नोंद होत आहे.

रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार

एस डी सानप यांच्या माहितीनुसार येणाऱ्या पाच दिवसांमध्ये सर्वदूर चांगला पाऊस पडेल. आज रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे देण्यात आला आहे. पावसाची हीच स्थिती पुढील दोन कायम असेल.

जून महिन्यात पावसाची 70 टक्के तूट

दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्या वीस दिसांत महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सक्रिय होतो. परंतु आता जून महिना संपण्यााला फक्त सात दिवस उरलेले असूनही मोसमी पावसाने राज्य व्यापलेले नाही. जून महिन्यात आतापर्यंत अपेक्षेपेत्रक्षा खूपच कमी पाऊस झाला. एक जून ते आतापर्यंत जो पाऊस झाला आहे त्यामध्ये 70 टक्के तूट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करायची असेल तर शासकीय सूचना यांचे पालन करावे, असे सांगितले जात आहे.

Follow Us