AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएमसी निवडणूकांबाबत महत्वाचे अपडेट, मुंबईत जैसे थे प्रभाग रचना

अ, ब आणि क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे.

बीएमसी निवडणूकांबाबत महत्वाचे अपडेट, मुंबईत जैसे थे प्रभाग रचना
| Updated on: Jun 10, 2025 | 11:14 PM
Share

गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.या निवडणूकांसाठी तीन टप्प्यात प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका लागल्याचा अंदाज आहे. तत्पूर्वी लोकसंख्येनुसार मुंबई महानगर पालिकेत प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले आहेत. राज्यातील ९ महानगर पालिकांच्या निवडणूका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष ठरवायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. अ, ब आणि क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तात्काळ घेण्याचे आदेश जारी झाले आहेत. राज्यातील ९ महानगर पालिकांच्या निवडणूका होत आहे. महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.

मुंबईमध्ये आधीही 227 प्रभाग होते. महाविकास आघाडीचे सरकारआल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन 236 प्रभाग करण्यात आले होते. पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 227 प्रभाग करण्यात आले. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परतू ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये आता 227 प्रभाग असणार आहेत.

महानगर पालिकांच्या निवडणूक प्रक्रीयेमध्ये

१ ) प्रभाग रचना करणे  आणि आरक्षण ठरविणे

२ ) विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करणे,

३) प्रत्यक्षनिवडणूक घेणे अशा तीन प्रमुख टप्प्यांचा समावेश होतो.या तिनही टप्प्यांच्या प्रक्रियेमध्ये उप-टप्पे देखील आहेत.

या महानगरपालीकांसाठी चार सदस्यीय प्रभाग

अ, ब आणि  क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी झाले आहेत.

महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१, दिनांक ११.०३.२०२२, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ५ मधील तरतुदीनुसार निवडणुकीकरिता प्रभाग रचना शासनाने, राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची आहे. खालील “अ, ब आणि  क” वर्ग महानगरपालिकांच्या बाबतीत प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याच्या अनुषंगाने सदस्य संख्या निश्चित करुन प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करणे ही जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांची असणार आहे.

‘अ’ वर्ग महानगर पालिकेत – पुणे, नागपूर

‘ब’ वर्ग महानगर पालिकेत ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड,

‘क’ वर्ग महानगर पालिकेत नवीमुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजी नगर , कल्याण-डोंबिवली यांचा समावेश आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.