मुस्लिम समाजाचे एसबीसी आरक्षण रद्द होताच इम्तियाज जलील यांचा थेट माैलानांवर निशाणा, म्हणाले, यांनी आता..

मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. आता इम्तियाज जलील यांनी यावर भाष्य केले असून मोठे आवाहन केले आहे.

मुस्लिम समाजाचे एसबीसी आरक्षण रद्द होताच इम्तियाज जलील यांचा थेट माैलानांवर निशाणा, म्हणाले, यांनी आता..
imtiaz jaleel
| Updated on: Feb 18, 2026 | 2:05 PM

राज्यातील मुस्लिम समुदायाच्या आरक्षणाबद्दल धक्कादायक बातमी आली. थेट मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाने अनेकांना मोठा धक्का बसला. आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा शासनादेश जारी करण्यात आल्याने खळबळ उडाली. मुस्लीम समाजाकडून याला जोरदार विरोध होत आहे. आता यासर्व गोष्टींवर राज्याचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठे भाष्य केले. UPSC मध्ये राज्यातील मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मी मध्ये एकदा सांगितले होते की, ब्राम्हण समाजामध्येही खूप श्रीमंत लोक आहेत, असे नाही, गरीब लोकांना मदत करण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला होता.

ब्राम्हण समाजामध्येही काही गरीब लोक आहेत, ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण ते घेऊ शकत नाहीत, त्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. आमच्या समाजातीलही काही लोक आहेत, ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण ते घेऊ शकत नाहीत, अशा लोकांना त्यांचे उत्पन्नाचा स्त्रो बघून काही सवलत देण्यात यावी, याकरिता आम्ही सातत्याने प्रयत्न केली आहेत.

आता माझी अपेक्षा आमच्या समाजातील असे बरेच लोक आहेत, त्यामध्येही विशेष करून माैलाना लोक आहेत. आता निवडणुका आल्या की, काही लोक घराबाहेर येतात. आमच्या शहरातही आले होते. त्यांनी म्हटले की, आपल्याला या व्यक्तीला मतदान करायचे आहे. मग तुम्ही पाच वर्षातून एकदाच येणार आहात का? आता समाजावर संकट आले आहे.

आता आमची अपेक्षा आहे की, आमच्या समाजातील जे माैलाना आहेत, जे राजकारणाच्या वेळी निवडणुकीच्या दोन ते तीन महिने अगोदर खूप सक्रिय होतात ते कशामुळे होतात का होतात हे सर्वांना माहिती आहे. आता मी तुम्हाला बीडचे सांगतो… तिथलच्या सर्व माैलवी लोकांनी निर्णय घेतला होता की, आपल्या सर्वांना अजित पवार यांच्यासोबत जायचे आहे, मग त्यांना ऐकून दिले मतदान. माझी अपेक्षा ही आहे की, या सर्व माैलाना लोकांनी नेतृत्व करावे, मी मागे राहणार आहे.

नाही तर हे झालेले आहे की, पाच वर्ष आम्ही रस्त्यावर आंदोलन करू आणि निवडणूक आली की, आमचे हे काही लोक दुकान उघडायला येतात. यांना मतदान करा त्यांना मतदान करा हे धंदे चालवतात. आता यांची जबाबदारी आहे की, त्यांनी याचे नेतृत्व करावे आम्ही त्यांच्या मागे आहोत. गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित राहू नये, ही आमची अपेक्षा असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.