Yavatmal Youth Attack : नेम धरला, गोळी झाडली, मात्र गोळीच बंदुकीत अडकली…; मग तरुणाला चाकूने भोसकले

| Updated on: Jun 29, 2022 | 8:41 PM

या हल्ल्यात जखमी झालेल्या सचिन हराळ याच्या विरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो जामीनावर कारागृहातून बाहेर आला आहे. सचिन याचा तीन दिवसांपूर्वीच एका जवळच्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. त्याच वादाचा वचपा काढण्यासाठी त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला असावा अशी म्हटले जाते.

Yavatmal Youth Attack : नेम धरला, गोळी झाडली, मात्र गोळीच बंदुकीत अडकली...; मग तरुणाला चाकूने भोसकले
नेम धरला, गोळी झाडली, मात्र गोळीच बंदुकीत अडकली...
Image Credit source: TV9
Follow us on

यवतमाळ : पत्नीला परिक्षेसाठी महाविद्यालयात सोडण्यासाठी गेलेल्या युवका (Youth)वर तीन अनोळखी हल्लेखोरांनी देश कट्ट्याने गोळीबार (Firing) केल्याची घटना यवतमाळमधील पुसद येथे घडली आहे. पुसद येथील गुणवंतराव देशमुख महाविद्यालयात दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र गोळीबार करताना देशी कट्ट्यात गोळी अडकल्याने चाकूने भोसकून त्या युवकाला गंभीर जखमी (Injured) करण्यात आले. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. सचिन माधवराव हराळ (37 रा. शिवाजी वार्ड) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. जुन्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याची मिळते.

या हल्ल्यात जखमी झालेल्या सचिन हराळ याच्या विरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो जामीनावर कारागृहातून बाहेर आला आहे. सचिन याचा तीन दिवसांपूर्वीच एका जवळच्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. त्याच वादाचा वचपा काढण्यासाठी त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला असावा अशी म्हटले जाते.

बंदुकीत गोळी अडकल्याने चाकूने भोसकले

पुसद शहरापासून जवळच असलेल्या श्रीरामपुर ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुणवंतराव देशमुख महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात आज टिळक मुक्त विद्यापीठाचा पेपर होता. या ठिकाणी सचिन हराळ याची पत्नी देखील पेपर असल्याने तो तिला सोडण्यासाठी दुपारी महाविद्यालयाच्या प्रांगणात आला होता. दरम्यान पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच तोंडाला रुमाल बांधून आलेले आणि काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरुन आले आणि सचिनवर अचानक हल्ला चढवला. महाविद्यालयाच्या प्रांगणातील ओट्यावर चढून त्यांनी सचिनवर जुन्या देशी बनावटीच्या कट्ट्याने एक राऊंड फायर केला. तो नेम चुकल्याने दुसरा राउंड फायर केला, मात्र यावेळी बंदुकीतील गोळी बंदुकीतच अडकल्याने देशी बनवटीचा कट्टा त्यांच्या हातातून पडला. त्यानंतर एका हल्लेखोराने सचिनच्या पाठीवर चाकूने दोन वार केले. या हल्ल्यात जखमी झालेला सचिन खाली पडताच हल्लेखोर दुचाकी घेऊन पसार झाले.

हल्ल्यात तरुणाच्या मणक्याला दुखापत

हल्ल्यामुळे सचिनच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या सचिनला येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने डॉक्टरांनी त्याला नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात सांगितले. जखमी सचिनवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पुसद शहर पोलीस तातडीने घटनास्थळ दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन घटनास्थळावरुन देशी कट्टा आणि चाकुचे कव्हर ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू करण्यात आली होती. सोबतच फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे. दरम्यान भर दिवसा प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (In an old dispute a young man was shot and stabbed in Yavatmal)