मोठी बातमी! ठाकरेंचा मास्टर गेम, सरकारसह एकनाथ शिंदेंना जबर धक्का, थेट 6 बंडखोर खासदारांना..

डिलिमिटेशन बिल संसदेत मांडले जाणार आहे. या बिलाविरोधात इंडिया आघाडी विरोधात आहे. त्यातच इंडिया आघाडीमध्ये मोठी फूट पडली. शरद पवारांच्या पक्षाने वेगळी भूमिका घेतली. दिल्लीत घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच ठाकरेंनी मोठा गेम केला.

मोठी बातमी! ठाकरेंचा मास्टर गेम, सरकारसह एकनाथ शिंदेंना जबर धक्का, थेट 6 बंडखोर खासदारांना..
Shiv Sena Thackeray faction
| Updated on: Nov 29, 2026 | 12:27 PM

डिलिमिटेशन बिल उद्या संसदेत सादर होणार आहे. इंडिया आघाडी या बिलाविरोधात आहे. काल त्यांनी दिल्लीत बैठकही घेतली. मात्र, शरद पवारांच्या पक्षाचा एकही नेता किंवा खासदार या बैठकीला उपस्थित नव्हता. जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाकडून अगोदरच जाहीर केले की, त्यांच्याकडून या विधेयकाला पाठिंबा दिला जाणार आहे. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. शिवाय इंडिया आघाडीत मोठी फूट पडल्याचे बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांना अखिलेश यादव यांनी फोन केला. या बिलाच्या विरोधात असल्याची चर्चा केली. यासोबत शरद पवारांनी साथ सोडली, याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

उद्या कोणताही खासदार आपला फुटणार नाही, याकरिता विरोधी पक्षाकडून व्हिप जारी केले जात आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार दिल्लीत दाखल होतील. त्यांची स्वतंत्र बैठक सुप्रिया सुळे यांनी बोलावली आहे. दिल्लीत त्या खासदारांसोबतच दाखल होती. त्यातच शिवसेना ठाकरे गटाने मोठी खेळी केली. सरकारला थेट मोठा धक्का देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे.

Loading...

ठाकरेंच्या शिवसेनेकडून फुटलेल्या सहा खासदारांना देखील व्हीप जाही करण्यात आला. आजच्या बैठकीचा शिंदे सेनेत गेलेल्या खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. जून महिन्यात ठाकरेंचे सहा खासदार ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत गेले होते. हे प्रकरण कोर्टात आहे. आज महत्वाची बैठक खासदारांची आहे.

त्यातच शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांना त्यांनी व्हीप जारी केला. पक्षाकडून व्हीप देण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. आता हे खासदार नक्की काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.  मात्र, सरकारविरोधात मोठी खेळी शिवसेना ठाकरे गटाने केली. डिलिमिटेशन बिलाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला. त्यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us