Manoj Jarange Patil : हैदराबाद गॅझेटियरमध्ये संख्या पण तालुका, व्यक्तीची माहिती नाही मग आरक्षण कसं द्यायचं? मनोज जरांगेंकडे काय उत्तर?

Manoj Jarange Patil :"याला जोडून फडणवीस आणि विखेंना एक गोष्ट सांगतो, संभाजीनगर आणि जालना जिल्हा पूर्वी एकच होता. यात 2 लाख 54 हजार कुणबी होते, ते कुठे गायब केले? याचं उत्तर द्या. 39 टक्के कुणबी बीड जिल्ह्यात आहेत. 1 लाख 70 हजार नांदेडमध्ये आहेत. हे सर्व कुणबी लोक गेले कुठे?.

Manoj Jarange Patil : हैदराबाद गॅझेटियरमध्ये संख्या पण तालुका, व्यक्तीची माहिती नाही मग आरक्षण कसं द्यायचं? मनोज जरांगेंकडे काय उत्तर?
Manoj Jarange Patil
| Updated on: Oct 04, 2025 | 12:43 PM

काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागली. काँग्रेस लोकसभेच्यावेळची मराठ्यांच्या उपकाराची परतफेड करतय. काँग्रेस आपला सुपडा साफ करुन घेईल, मग वडेट्टीवारला एकट्याला घेऊन बसा अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसवर केली. हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील सगळा मराठा कुणबी आहे, त्यामुळे गॅझेट लागू करु नका, तर प्रमाणपत्र वाटप करा. पुन्हा तेच सांगतो असं मनोज जरांगे पाटील बोलले. विखे साहेबांना सांगतो जी प्रतिमा तुमची तयार झाली आहे, ती डागाळू नका. मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी उतरु नये, मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. त्याला प्रमाणपत्र द्या” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

याला जोडून फडणवीस आणि विखेंना एक गोष्ट सांगतो, संभाजीनगर आणि जालना जिल्हा पूर्वी एकच होता. यात 2 लाख 54 हजार कुणबी होते, ते कुठे गायब केले? याचं उत्तर द्या. 39 टक्के कुणबी बीड जिल्ह्यात आहेत. 1 लाख 70 हजार नांदेडमध्ये आहेत. हे सर्व कुणबी लोक गेले कुठे?. म्हणून हैदराबाद गॅझेटमध्ये जी संख्या दिलीय, 2.50 लाखाची, हे जालना, संभाजीनगरमधले तेच मराठे आहेत, जे कुणबी होते असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.  “तुम्ही मजा बघत असाल, आज करु, उद्या करु. तर फडणवीस आणि विखे तुमच्या नरड्यावर येईन, पळायलाही जागा उरणार नाही” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

हैदराबाद गॅझेटियरमध्ये संख्या पण इतर पुरावे नाहीत

हैदराबाद गॅझेटियरमध्ये संख्या आहे, यात दस्तावेज शोधण्यासाठी सरकार दोनवेळा हैदारबादला जाऊन आलं, त्यात तालुक, व्यक्ती, गाव पातळीची माहिती नाहीय. पुरावे कुठून द्यायचे हा प्रश्न आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या अभ्यासानुसार उत्तर दिलं.

आज 4 ऑक्टोंबर 2025 रोजी या खोलीत आपण 15 जण आहोत. या खोलीत 2050 साली आपल्या 15 जणांचे किमान 50 जण असतील हे मान्य करावं लागेल. तुमच्या अभ्यासकांना उत्तर देतोय. तसच त्याकाळी संभाजीनगर, जालन्यामध्ये 2.50 लाखाची संख्या होती. नंतर तुमच्या तहसीलदाराला काय पाहिजे? माहिती कोणती गोळा करताय? गॅझेटमध्ये काय सांगितलय, 2.50 लाख संभाजी नगर, जालन्यामध्ये कुणबी होते, म्हणजे आताचे दोन्ही जिल्ह्यातले सगळे मराठे कुणबी आहे हे क्लियर आहे ना. 1881, 1901 च्या नोंदीनुसार तो मराठा कुणबी आहे. जसं की, या खोलीत आपण 15 आहोत, 20-25 वर्षाने 50 होऊ. हैदराबाद गॅझेटनुसार, उदहारणार्थ 2.50 लाखाच्या संख्येसाठी 1967 सालचा पुरावा घ्या. रक्ताच्या नातेवाईकांना कसं द्यायचे ते आम्ही बघतो. अभ्यासकांच कारण नका देऊ असं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं.