AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातील नायक ठरले अकाली ‘काळाचे बळी’, कोण आहेत ‘ते’ 7 आमदार आणि 3 खासदार

राज्यात 2019 मध्ये लोकसभा निवडणूक झाल्या. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणूक झाल्या. या निवडणुकांमधून उसंत मिळत नाही तोच देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले. याच कोरोनाने पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके या पहिल्या लोकप्रतिनिधीचा बळी घेतला.

राजकारणातील नायक ठरले अकाली 'काळाचे बळी', कोण आहेत 'ते' 7 आमदार आणि 3 खासदार
SANSAD MEMBERS
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: May 31, 2023 | 4:27 PM
Share

मुंबई : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला होता. भाजपची विजयी घोडदौड सुरु होती. काँग्रेसचा वारू डगमगला असताना राज्यात मात्र बाळू धानोरकर यांनी हा वारू धरून ठेवला. विदर्भात भाजपचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे असे मात्तबर नेते असताना चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. त्याच खासदार बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झाले. आज त्यांच्यावर चंद्रपूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

खासदार बाळू धानोरकर यांच्यावर किडनीच्या आजारावर प्रथम नागपुरात आणि नंतर दिल्लीत उपचार करण्यात आले. मात्र, त्यांचा हा लढा अयशस्वी ठरला. खासदार बाळू धानोरकर काळाचे अकाली बळी ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात धानोरकर यांच्याप्रमाणेच तीन खासदार आणि 7 आमदार होते यांची कारकीर्द अशीच अकाली संपली.

राज्यात 2019 मध्ये लोकसभा निवडणूक झाल्या. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणूक झाल्या. या निवडणुकांमधून उसंत मिळत नाही तोच देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले. याच कोरोनाने पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके या पहिल्या लोकप्रतिनिधीचा बळी घेतला.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे 20 नोव्हेंबर 2020 रोजी कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. होते. कोरोना दरम्यानच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. यातच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतपूरकर

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे 9 एप्रिल 2021 रोजी कोरोनामुळे निधन झाले. नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. मुंबईत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षनेते शरद रणपिसे यांचे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान 23 सप्टेंबर 2021 रोजी निधन झाले.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडून आलेले काँगेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे 2 डिसेंबर 2021 रोजी निधन झाले. त्यांनाही कोरोना झाला होता. कोरोनामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान वयाच्या 57 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके

मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेना आमदार रमेश लटके यांचे 12 मे 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. दुबई येथे मित्राला भेटायला गेले असताना रमेश लटके यांचा मृत्यू झाला.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक

पुण्याच्या माजी महापौर आणि कसबा मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी त्या झुंज देत होत्या. पण, त्यांची झुंज अपयशी ठरली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. आधी राष्ट्रवादी आणि नंतर भाजपमध्ये त्यांनी आपले स्थान मजबूत केले. ते 60 वर्षांचे होते. जवळपास तीन वर्षांपासून ते ही कर्करोगाशी झुंज देत होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.

काँग्रेस खासदार राजीव सातव

राहुल गांधी यांचे विश्वासू खासदार राजीव सातव यांचे 16 मे 2021 रोजी वयाच्या 47 वर्षी निधन झाले. सातव यांना 22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावली. अखेर महिनाभरानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

भाजप खासदार गिरीश बापट

पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेस खासदार ​बाळू धानोरकर

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ ​​बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. आज त्यांच्यावर चंद्रपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?