AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकीच्या उपचाराने गर्भातील बाळाचा मृत्यू, पैशांसाठी 22 तास तसेच पोटात ठेवले, कुटुंबियांचा आरोप

वैजनाथ मुंडे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात परळी शहर पोलिस ठाण्यात संबंधित महिला डॉक्टर विरोधात लेखी तक्रार देण्यात आली आहे. हा सर्व प्रकार डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारा असून आता चौकशीनंतर या खाजगी डॉक्टरांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

चुकीच्या उपचाराने गर्भातील बाळाचा मृत्यू, पैशांसाठी 22 तास तसेच पोटात ठेवले, कुटुंबियांचा आरोप
Doctor's Negligence
| Edited By: | Updated on: May 07, 2026 | 4:37 PM
Share

परळीत एका खाजगी रुग्णालयाच्या निष्काळजीपणाने गर्भवती महिलेच्या जीवालाच धोका निर्माण झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या महिलेला सुरुवातीपासूनच संबंधित डॉ. महिलेच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. चुकीच्या उपचाराने गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित महिलेच्या पतीने केला आहे. त्यानंतर पैशांसाठी हे मृत बाळ या महिलेत्या पोटात २२ तास ठेवण्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

परळीतील एका खाजगी रुग्णालयात एका गर्भवती महिलेवर आठ ते साडे आठ महिन्यांपासून ट्रीममेंट सुरु होती. डॉ.कल्पना गित्ते यांच्याकडे ही ट्रीटमेंट सुरु होती.आपल्या पत्नीवर चुकीचे उपचार केल्याने पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप गर्भवती महिलेचे पती वैजनाथ मुंडे यांनी केला आहे. आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी डॉ. कल्पना गित्ते यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, कल्पना गीते यांनी पोटामध्ये बाळ मृत झाल्यानंतरही प्रसूतीसाठी दाखल झालेल्या पत्नीवर उपचार करत असल्याचे कुटुंबियांना सांगितले. मात्र डॉक्टरच्या हलगर्जीने बाळ तर दगावलेच, पण त्यानंतर या बाळाच्या मातेची प्रचंड हेळसांड करुन तिच्याही जीवाशी खेळ केल्याचा प्रकार डॉक्टरांनी केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महिलेचे पती वैजनात मुंडे यांनी केली आहे.

डॉक्टर कल्पना गित्ते यांचे परळीमध्ये आलिशान खाजगी रुग्णालय आहे. वैजनाथ मुंडे यांनी त्यांच्या पत्नीला गरोदर राहिल्यापासूनच कल्पना मुंडे यांच्याकडे उपचार घेण्यासाठी आणले होते. प्रसूतीसाठी जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला या रुग्णालयात दाखल केले, तेव्हा पत्नीवर योग्य उपचार केल्याचे डॉक्टर कल्पना गीते यांनी वैद्यकीय भाषेत सांगितले होते. आता आता प्रकरणात सारवासारव केली असून बाळ आईच्या पोटात मृत होऊनही त्याला बावीस तास पोटातच का ठेवण्यात आले ? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी समिती

गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याने मुडे कुटुंबीय प्रचंड तणावात आहे. आणि त्यातच डॉक्टरांनी उपचारादरम्यान कुठलंही सहकार्य केले नाही. परळीत वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर प्रकार या डॉक्टरांनी केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात आता जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि परळी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी होताच बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार साळुंके याप्रकरणी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

Follow Us
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर...
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर....
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा.
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय...
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय....
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!.
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची...
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची....
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड.
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?.
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या..
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?.