VIDEO | शॉर्टसर्किटचं निमित्त, तब्बल 40 एकरातील ऊस आगीच्या कचाट्यात, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

| Updated on: Feb 08, 2021 | 7:50 PM

जिल्ह्यातील कामेरी परिसरातील कामेरी- तुजारपूर रोडवरील उसाच्या (sugarcane) फडाला भीषण आग लागली. (Sangli fire sugarcane farm)

VIDEO | शॉर्टसर्किटचं निमित्त, तब्बल 40 एकरातील ऊस आगीच्या कचाट्यात, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सांगलीमध्ये अशा प्रकारे उसाच्या फडाला आग लागली
Follow us on

सांगली : जिल्ह्यातील कामेरी परिसरातील कामेरी- तुजारपूर रोडवरील उसाच्या (sugarcane) फडाला भीषण आग लागली. फडावरून गेलेल्या विजेच्या तारेत शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती आहे. पुढे ही आग वाढत जाऊन जवळपास तब्बल 40 एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचे सांगण्यात येत आहे. (in Sangli fire broke out in 40 acres sugarcane farm)

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील कामेरी परिसरातील कामेरी- तुजारपूर रोडवर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उस पिकवलेला आहे. मात्र येथे उसाच्या फडावरुन गेलेल्या विजेच्या तारेत अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्याने येथे आग लागली. ही आग नंतर मोठी होऊन परिसरातील 40 एकरामध्ये ही आग पसरली. पुढे आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाल्याने तब्बल 40 एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, सुदैवाने या आगीत कोणितीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीचे स्वरूप पाहता कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. या आगीत गाळप करण्यायोग्य झालेला ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

बीडमध्येसुद्धा 8 एकर ऊस जळून खाक

शेतकरी हा रात्रंदिवस शेतात राबतो. मेहनत करुन तो काळ्या मतीत पीक घेतो. अनेकवेळी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ अशा अनेकविध संकटांना त्याला तोंड द्यावे लागते. कित्येक वेळा तर अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे हातात आलेल्या पिकाला त्याला मुकावे लागते. मात्र, महावितरण म्हणजेच सरकारमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. माजलगाव तालुक्यात विजेची नीट जोडणी केलेली नसल्यामुळे येथील परिसरात सर्रास शॉर्टसर्किट होतात. त्यामुळे शेतात हमखास आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. शॉर्टसर्किटमुळे तब्बल 8 एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना माजलगावमध्ये घडली आहे.

 

पाहा आगीचा व्हिडीओ 

इतर बातम्या :

 

in Sangli fire broke out in 40 acres sugarcane farm