video | शेतात शॉर्टसर्किट, काही क्षणांत तब्बल 8 एकरातील ऊस जळून खाक, पाहा व्हिडीओ

माजगलगावमध्ये शेतात शॉर्टसर्किट झाल्यामुळे तब्बल 8 एकर ऊस (sugarcane) जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. (sugarcane burn short circuit)

video | शेतात शॉर्टसर्किट, काही क्षणांत तब्बल 8 एकरातील ऊस जळून खाक, पाहा व्हिडीओ
बीडमध्ये अशा प्रकारे ऊस जळून खाक झाला.

बीड : बळीराजाला अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांना तोंड द्यावं लागतं. मात्र, महावितरणच्या ढिसाळ कारभार हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे बीडमध्ये पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील माजलगावमध्ये शेतात शॉर्टसर्किट झाल्यामुळे तब्बल 8 एकर ऊस (sugarcane) जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या शॉर्टसर्किटमध्ये तब्बल तीन शेतातील ऊस जळाला आहे. शरद जाधव, लक्ष्मण जाधव, एकनाथ बेदरे अशी या पीडित शेतकऱ्यांची नावं आहेत. विशेष म्हणजे शॉर्टसर्किटमुळ पीक जळाल्याची माजलगाव तालुक्यातील ही सातवी घटना आहे. (In beed 8 acres of sugarcane has been burn out due to short circuit)

शेतकरी हा रात्रंदिवस शेतात राबतो. मेहनत करुन तो काळ्या मतीत पीक घेतो. अनेकवेळी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ अशा अनेकविध संकटांना त्याला तोंड द्यावे लागते. कित्येक वेळा तर अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे हातात आलेल्या पिकाला त्याला मुकावे लागते. मात्र, महावितरण म्हणजेच सरकारमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. माजलगाव तालुक्यात विजेची नीट जोडणी केलेली नसल्यामुळे येथील परिसरात सर्रास शॉर्टसर्किट होतात. त्यामुळे शेतात हमखास आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. शॉर्टसर्किटमुळे तब्बल 8 एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना माजलगावमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आठ एकराच्या परिसरामध्ये तीन शेतकऱ्यांनी ऊस पिकवला होता. तिघांचेही शेत एकमेकांना लागून होते. शरद जाधव, लक्ष्मण जाधव, एकनाथ बेदरे यांच्या शेताच्या परिसरात अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्यामुळे येथे आगल लागली आणि तिन्ही शेतातील उसाने अचानकपणे पेट घेतला. लागलेल्या आगिमुळे या तिन्ही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे उभा ऊस जळाल्याचा आरोप या तिन्ही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांनी शासनाने त्वरित मदत करण्याचीही मागणी केली आहे.

पाहा व्हिडीओ :

 

 

इतर बातम्या :

मुलगी घरातून रागाने गेली, बाहेर गेल्यानंतर ट्रेनमधून पडून मृत्यू

‘आजच्या आंदोलनात फूट पाडण्याचेही प्रयत्न करायचे असेच सत्ताधाऱ्यांचे मनसुबे’

Farmers Protest | शेतकरी आंदोलन : संभाव्य तोडगा काय?

(In beed 8 acres of sugarcane has been burn out due to short circuit)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI