साखर कारखाना महासंघाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा डंका; मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार ‘या’ कारखान्याकडे

साखर कारखाना महासंघाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा डंका; मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार 'या' कारखान्याकडे
ऊस

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या 21 पुरस्कारांमध्ये 9 पुरस्कार मिळवत महाराष्ट्रानं बाजी मारली आहे. (sugarcane industry awards )

Yuvraj Jadhav

|

Jan 29, 2021 | 4:30 PM

पुणे: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्यावतीने हंगाम 2019-20 या वर्षातील देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखान्यांठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुणे येथे या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मानाचा समजला जाणारा वसंतदादा पाटील पुरस्कार राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि कुंभी कासारी या कारखान्यानाही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एकूण 21 पुरस्कारांमध्ये 9 पुरस्कार मिळवित महाराष्ट्राने वर्चस्व राखलयं. (Maharashtra got nine awards in National Cooperative sugarcane industry federation of 2019-21)

गुजरातमध्ये पुरस्कार वितरण

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे जाहीर झालेले पुरस्कार मार्च महिन्यामध्ये देण्यात येणार आहेत. गुजरातमधील स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या परिसरात 26 मार्च रोजी पुरस्कार वितरण होईल. जागतिक आव्हाने व भारतीय साखर उद्योगाला संधी या विषयावर चर्चासत्र होईल त्या कार्यक्रमात हे पुरस्कार दिले जातील. माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार, केंद्रीय अन्न राज्यमंत्री रावसाहेब दानवे व अन्य राज्यांचे मंत्री व साखर उद्योगाशी संबंधित प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

साखर संकुलात पुरस्कारांची घोषणा

पुण्यातील साखर संकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी राज्य साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ हे उपस्थित होते. उत्कृष्ठ ऊस उत्पादकतेसाठी (उच्च उतारा विभाग) प्रथम पारितोषिक हे सांगली जिल्ह्यातील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा, द्वितीय पारितोषिक सातारा येथील आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या नेतृत्वातील अजिंक्यतारा कारखाना, तांत्रिक कार्यक्षमतेचे प्रथम पारितोषिक पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी, द्वितीय पारितोषिक सांगली येथील क्रांती अग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यास मिळाले.

उत्कृष्ठ वित्तीय व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार गुजरातमधील श्री नर्मदा खांड उद्योग तर द्वितीय पुरस्कार जालना येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी यांना जाहीर झाला. विक्रमी ऊस उतार्‍याचे पारितोषिक कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी कासारी, विक्रमी साखर निर्यातीचा प्रथम पारितोषिक कोल्हापूरमधील जवाहर सहकारी कारखान्यास तर द्वितीय पारितोषिक सातारा जिल्ह्यातील कराड येथील सह्याद्री सहकारी कारखान्यास जाहीर झालाय.राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून पारितोषिक मिळवणाऱ्या कारखान्यांचं कौतुक करण्यात आलेय.

संबंधित बातम्या:

आंध्र प्रदेशातील शेतकऱ्याचं लाखोंच उत्पन्न, मोठमोठ्या व्यावसायिकांनाही टाकलं मागं

कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, केंद्र सरकारने नारळाची एमएसपी वाढवली!

(Maharashtra got nine awards in National Cooperative sugarcane industry federation of 2019-21)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें