म्हणून “या” गावात पाडव्याच्या रात्री म्हशी पळविण्याची परंपरा, शेतकरी काढतात मिरवणूक

सोलापूर मधील अनेक जुनी मंडळी या म्हशी पळविण्याच्या कार्यक्रमात हिरीरीने सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.

म्हणून या गावात पाडव्याच्या रात्री म्हशी पळविण्याची परंपरा, शेतकरी काढतात मिरवणूक
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 26, 2022 | 9:24 PM

संदीप शिंदे, टीव्ही 9 मराठी, माढा-सोलापूर : प्रांत बदलला की संस्कृती बदलते, त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या रूढी आणि परंपरा या वैविध्यपूर्ण असतात आणि ते जाणून घेण्याची अनेकांची इच्छा देखील असते. महाराष्ट्रातील सोलापूरमधील (Solapur News) एक संस्कृती आगळीवेगळी आहे. दिवाळी सणांमध्ये असणारा दिवाळी पाडवा (Diwali Padva) म्हणजे सोलापूरात एक वेगळा जल्लोष पाहायला मिळतो. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सोलापूरमध्ये रात्रीच्या वेळी म्हशी (Baffalo) पळविण्याची परंपरा आहे. त्यांच्यावर गुलाल टाकून शेतकरी म्हशी एकत्र आणतात. त्यानंतर त्यांना विशिष्ट मार्गावरुन एकाच वेळी एकत्रित पळविले जाते. म्हशींच्या मिरावणुकीच्या या कार्यक्रमाची हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे. दिवाळी पाडव्याला शेतकरी मोठ्या संख्येने एकत्रित येत असतात. कोरोना काळात देखील या निर्बंध असल्याने नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले होते. मात्र, काही गावांमध्ये कोरोना नियम धुडकावून लावत म्हशी पळविण्याचा कार्यक्रम पार पडला होता.

राज्यातील ग्रामीण भागात शेतकरी अजूनही आपल्या रूढी परंपरा जपत वर्षानुवर्षे चालत आलेल्या मिरवणुका काढत असतात.

त्यानुसार यंदाच्या वर्षी सोलापूर येथील माढा शहरात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने शेतकरी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते.

माढा शहरात पंचक्रोशीतून अनेक शेतकरी म्हशी पळविण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, मागील दोन वर्षे निर्बंध असल्याने यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला आहे.

सोलापूर मधील अनेक जुनी मंडळी या म्हशी पळविण्याच्या कार्यक्रमात हिरीरीने सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.

खरंतर या म्हशी पळविण्याच्या मिरवणुकीत कुठलाही व्यत्यय येणार नाही याची काळजी घेतली जात असते, दुचाकीवर समोर जाणारे तरुण देखील यामध्ये काळजी घेत असतात.

मात्र, म्हशी पळविण्याच्या या कार्यक्रमात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते, अनेकदा छोटे मोठ्या या दरम्यान घडलेल्या आहेत.