जे न देखे रवी, ते देखे कवीः साहित्य संमेलनात नवलच; गीतामध्ये लोकहितवादींच्या जागी नाना शंकरशेठांचा फोटो

साहित्यिक प्रज्ञावंत असतात. त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमानाचा वेध घेता येतो, असे मानतात. त्यामुळेच जे न देखे रवी, ते देखे कवी मानले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेक सुप्रसिद्ध साहित्यकृती घेता येतील. मात्र, नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या आयोजनात अग्रभागी असणाऱ्या प्रज्ञावंतांना याचा काहीही गंध नाही, असेच दिसते.

जे न देखे रवी, ते देखे कवीः साहित्य संमेलनात नवलच; गीतामध्ये लोकहितवादींच्या जागी नाना शंकरशेठांचा फोटो
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि नाना शंकरशेठ.
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 11:51 AM

नाशिकः साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण सुरूच आहे. नाशिकच्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक लोकहतिवादी मंडळ आहे. समाजसुधारक गोपाळ हरी देशमुखांच्या नावाने हे मंडळ चाललवले जाते. मात्र, संमेलन गीतामध्ये त्या लोकहितवादी यांच्या ऐवजी चक्क नाना शंकरशेठाचा फोटो टाकण्यात आला आहे. त्यामुळे निमंत्रक नाराज असल्याचे समजते.

साहित्यिक प्रज्ञावंत असतात. त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमानाचा वेध घेता येतो, असे मानतात. त्यामुळेच जे न देखे रवी, ते देखे कवी मानले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेक सुप्रसिद्ध साहित्यकृती घेता येतील. मात्र, नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या आयोजनात अग्रभागी असणाऱ्या प्रज्ञावंतांना याचा काहीही गंध नाही, असेच दिसते. आता हेच पाहा संमेलन ज्या नाशिकमध्ये होतेय तिथले भूमीपुत्र आणि साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिक वि. दा. सावरकर यांचेच नाव संमेलन गीतामध्ये घेतले नाही. त्यावरून प्रचंड वाद झाला. अखेर गीतामध्ये सावरकरांचे नाव समाविष्ट करण्यात आले. हे प्रकरण थंड होत नाही तोच याच गीताबाबत आणखी एक वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. या गीतामध्ये चक्क लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांच्याऐवजी नाना शंकरशेठ यांचे छायाचित्र टाकण्यात आले आहे.

चित्रमहर्षी सूरतपस्वी वैभव नटश्रेष्ठांचे
जनस्थान हे कर्मवीरांचे लोकहितवादाचे
उद्योगाचे पर्यटनाचे शहर कला क्रीडाचे
भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे
जयंत आले हसरे तारे घेऊन भेटींसाठी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक लोकहितवादी मंडळ आहे. आता त्यांच्याच नावाचा उल्लेख जिथे येतो, तिथे हा खोडसाळपणा केला आहे. लोकहितवादी आणि नाना शंकरशेठ यांच्या पगडीत, मिशात फरक आहे. दोघेही वेगवेगळे गंध लावायचे. हे इतके असूनही ही चूक झाली कशी, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. बहुतेक आयोजकांनी गीताचा सारा भार अतिशय अजाणत्यांवर सोपवलेला दिसतोय. त्यांनी सरळ गुगलमध्ये जे चित्र दिसले, ते उचलून टाकले, झाले असावे. अन्यथा ही घोडचूक झालीच नसती, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

इतर बातम्याः

40 हजार लिटर Biodiesel नाशिकमध्ये जप्त; 26 लाखांचा मुद्देमाल, 4 जणांवर गुन्हा

पोलीस भरती परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने नाशिकच्या तरुणाचा आयुष्याला पूर्णविराम

ST Strike| पवार-परबांची साडेचार तास बैठक; कोणताही ठोस निर्णय नाही, संपाचा तिढा कायम!