ST Strike| पवार-परबांची साडेचार तास बैठक; कोणताही ठोस निर्णय नाही, संपाचा तिढा कायम!

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, विलीनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. कोर्ट देईल तो निर्णय स्वीकारणार आहोत.

ST Strike| पवार-परबांची साडेचार तास बैठक; कोणताही ठोस निर्णय नाही, संपाचा तिढा कायम!
अनिल परब आणि शरद पवार.
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 3:34 PM

मुंबईः अखेर अतिशय ताणलेल्या आणि चिघळलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी साडेचार तास ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीचे तारणहार शरद पवार यांनी बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. मात्र, या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आलीय. स्वतः अनिल परब यांनी पत्रकार परिषदत घेऊन ही माहिती दिली. यामुळे मुंबईतल्या आझाद मैदानावर संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी परब जर रोज तेच-तेच बोलत असतील, तर त्या बैठकीला अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पवारांनी फक्त माहिती घेतली

मुंबईमध्ये वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पवारांनी संपाची माहिती घेतली. संपाबाबत कोणते पर्याय असू शकतात, याची चर्चा केली, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. या बैठकीत संपाबाबत समितीसमोर कोणती बाजू मांडायची यावरही विचार झाला. एसटीचे उत्पन्न कसे वाढू शकते, यावरचही चर्चा झाली. मात्र, संपाबाबत लगेच ठाम निर्णय झाला नाही. यावर पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेणार आहे, अशी माहितीही परब यांनी दिली. एकंदर आजची पवारांनी घेतलेली बैठक फक्त एक प्रकारची चाचपणी होती. त्यामुळे तूर्तास लगेच संप मिटेल, अशी शक्यता तरी दिसत नाही.

कोर्टाचा निर्णय स्वीकारणार

परब म्हणाले की, विलीनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. कोर्ट देईल तो निर्णय स्वीकारणार. शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे हाल होत आहेत. संप मिटवण्याचे प्रयत्नासाठी, संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या याबाबत चर्चा झाली. आज बऱ्यापैकी वेगवेगळ्या मार्गांची चर्चा झाली. हा संप लवकरात लवकर संपावा. त्यामुळे कर्मचारी आणि एसटीचे नुकसान होतेय. वेतनवाढीसंदर्भातही चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनातही यावर चर्चा होईल. त्यानंतर बिझनेस अँडव्हायजरी कमिटीसमोर हा विषय चर्चिला जाईल, अशी माहिती परबांनी दिली.

पडळकर आक्रमक

शरद पवारांनी बैठक घेतली म्हणजे संप मिटण्याच्या दिशेने पावले पडतील, अशी चर्चा होती. तशा अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र, बैठकीनंतर बाहेर येताच परबांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या दाव्यातील हवा पुरती निघाली आहे. यामुळे मुंबईतल्या आझाद मैदानावरील आंदोलकांमध्येही रोष दिसून येत आहे. आंदोलनासाठी बसलेले भाजप नेते गोपीचंद पडाळकर यांनी यावरून सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. सरकारला आंदोलनवर तोडगा काढायचा असेल, तर त्यांनी संपकऱ्यांशी बोलावे. चर्चा करावी. फक्त बैठका घेऊन उपयोग नाही. अनिल परब जर रोज-रोज तेच बोलत असतील, तर त्याला काय अर्थ आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

कामगारांप्रति समर्पित व्हा

बैठकीबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवारांनी हा संप सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असेल तर त्याचे स्वागतच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट आश्वासन दिले आहे. ते आश्वासन झोपेत दिलेले नाही. त्याचे पालन व्हावे, इतकीच अपेक्षा असल्याचे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. सरकारकडे फक्त एसटी कामगारांसाठीच पैसे नाही. हे सरकार ड्रग्ज पार्टी करणाऱ्यांना समर्पित आहे. सचिन वाझेंना समर्पित आहे. सरकारने शेतकरी आणि कामगारांना समर्पित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

इतर बातम्याः

Nashik|सेलू नदीवरील पूल गेला वाहून; 12 गावांचा संपर्क तुटला

घरचं झालं थोडं…म्हणे विनाहेल्मेट दुचाकीचालकांची 10 गुणांची परीक्षा; नाशिक पोलिसांचा निर्णय

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.