Nashik|सेलू नदीवरील पूल गेला वाहून; 12 गावांचा संपर्क तुटला

निफाड तालुक्यातील वनसगाव येथील सेलू नदीवरील पूल पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जवळपास 12 गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी गावकरी करत आहेत.

Nashik|सेलू नदीवरील पूल गेला वाहून; 12 गावांचा संपर्क तुटला
निफाड तालुक्यातील सेलू नदीवरील पूल वाहून गेल्याने पंचक्रोशीतील गावांचा संपर्क तुटला आहे.

लासलगावः निफाड तालुक्यातील वनसगाव येथील सेलू नदीवरील पूल पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जवळपास 12 गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकरी, चाकरमानी, विद्यार्थ्यी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हा पूल आणि पुलावरील कठडे त्वरित बांधून द्यावेत, अशी मागणी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी केली आहे.

गावकऱ्यांंना अडचण

निफाड तालुक्यातील उलदगाव येथील सेलू नदीवरील पूल यंदाच्या पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे. या नागरिकांना वाहन घेऊन या रस्त्यावरून पलीकडे जातच येत नाही. त्यामुळे प्रवासाचा मार्ग खुंटला आहे. इतक्या दिवस कोरोनामुळे शाळा बंद होत्या. आता शाळा सुरू आहेत. अनेकदा आजारी माणसाला पलीकडे घेऊ जावे लागते. मात्र, नदीवरील पूल वाहून गेल्याने पुलाच्या पुढे जाताच येत नाही. त्यामुळे जवळपास 12 गावांमधील गावकऱ्यांचा खोळंबा होतो आहे. हे लक्षात घेता प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी पुलाची बांधणी करावी. पुलाला कठडे बांधावे, अशी मागणी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी केली आहे.

भयंकर नुकसान

नाशिक जिल्ह्यात यंदा भयानक अतिवृष्टी झाली. पावसामुळे झालेला हाहाकार पाहून कुणाचेही काळीज पिळवटून निघेल इतके नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 7 हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या, 104 घरांची पडझड झाली. या विनाशकारी पावसाचा तब्बल 152 गावांमधील 69 हजार 269 शेतकऱ्यांना फटका बसला. पावसाने फळबागा, मका, बाजरी, कापूर, सोयाबीन, भुईमुगाचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यात कांद्याचे उभे पिके आडवे झाले. फळबागांचे नुकसान झाले. द्राक्ष व डाळिंब बागा उद्धवस्त झाल्या आहेत. अनेक घरांवरील वाऱ्यामुळे पत्रे उडाले आहेत. अनेक घरे पडली आहेत.

विक्रमी पाऊस

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून ओळखरा जातो. इथे बारा वर्षांत पहिल्यांदा इतका पाऊस पडला आहे. या पावसाळा इथे 12 तासांमध्ये 121 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले असून, खरीप हंगाम हातचा गेला आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठी धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा पाणीप्रश्नाची चिंता नाही.

इतर बातम्याः

Nashik| भाजपची कलेक्टर ऑफिससमोर निदर्शने, मालेगाव दंगलीचा नोंदवला निषेध, रझा अकादमीवर बंदीची मागणी

मोठी बातमी | ST संपाच्या शिष्टाईसाठी पवारांचा पुढाकार; अनिल परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक सुरू, तोडग्याची आशा

Nashik: डॉक्टर नववधूच्या Virginity Testचा अघोरी प्रकार टळला; पोलिसांचा दट्ट्या ठरला प्रभावी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI