मोठी बातमी | ST संपाच्या शिष्टाईसाठी पवारांचा पुढाकार; अनिल परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक सुरू, तोडग्याची आशा

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.

मोठी बातमी | ST संपाच्या शिष्टाईसाठी पवारांचा पुढाकार; अनिल परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक सुरू, तोडग्याची आशा
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 12:11 PM

मुंबईः एक अतिशय महत्त्वाची बातमी. चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे तारणहार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांची अनिल परबांसोबत वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये गुप्त बैठक सुरू असल्याचे समजते. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत का निर्णय होणार, विलीनीकरणाचा विचार होणार का, याची उत्सुकता लागली आहे.

भडका शमविणार?

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जवळपास 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह आझाद मैदानावर ठिय्या दिला आहे. त्यात एसटीच्या खासगीकरणाची सुरू झालेली चर्चा. नाशिकमधल्या पेठ आगारातील कर्मचाऱ्याने कमी पगारामुळे केलेला आत्महत्या. या साऱ्या घटनांमुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील अनेक कर्मचारी मुंबईला येत आहेत. मात्र, त्यांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे. काल मनमाड, घोटीच्या कर्मचाऱ्यांनाही अडवण्यात आले. काल कर्मचाऱ्यांनी टॉर्च लावून आंदोलन केले. हा भडका पाहता आता शरद पवारांनी हे आंदोलन सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातून काही मार्ग निघणार का, याची उत्सुकता आहे.

मुगंटीवारांची टीका

बैठकीबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवारांनी हा संप सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असेल तर त्याचे स्वागतच आहे. ही बैठक फक्त दोनच मुद्यावर होत असेल. एक तर संप सोडवायचा की, संप मोडून काढायाचा. यावर दुसरे काय चर्चिले जाणार. संपावर मार्ग निघू शकतो, तो काढावा असे आवाहन त्यांनी केले.

जाहीरनाम्यातले आश्वासन पाळा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट आश्वासन दिले आहे. ते आश्वासन झोपेत दिलेले नाही. त्याचे पालन व्हावे, इतकीच अपेक्षा असल्याचे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. सरकारकडे फक्त एसटी कामगारांसाठीच पैसे नाही. हे सरकार ड्रग्ज पार्टी करणाऱ्यांना समर्पित आहे. सचिन वाझेंना समर्पित आहे. सरकारने शेतकरी आणि कामगारांना समर्पित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

इतर बातम्याः

जरंडेश्वरप्रमाणेच खोतकरांचा घोटाळा, सोमय्यांचा आरोप; नांगरे-पाटलांची पत्नी, सासऱ्यांचेही घेतले नाव, चौकशीच्या मागणीसाठी उद्या दिल्लीला जाणार

यशोमती ताई फिरल्याचे चालते, मग विरोधी पक्षनेत्यांचे फिरणे भडकावणे कसे; भाजप नेते शेलारांचा सवाल

शरद पवारांच्या दोन निकटवर्तीयांना ईडीची नोटीस, सोमय्यांचा दावा; अजित पवारांबद्दल मात्र यू टर्न

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.