शरद पवारांच्या दोन निकटवर्तीयांना ईडीची नोटीस, सोमय्यांचा दावा; अजित पवारांबद्दल मात्र यू टर्न

शरद पवारांचा उजवा आणि डावा हात जगदीश कदमांना ईडीनं दोन नोटीस पाठवली आहे. 100 कोटीची वसुली कशी केली, याचा हिशेब राजेंद्र पाटोळे आणि जगदीश कदमांनी दिला आहे. मग पवारांना त्याची भीती आहे का, त्यांना नेमकी कोणाची काळजी आहे, असा सवाल सोमय्यांनी केला.

शरद पवारांच्या दोन निकटवर्तीयांना ईडीची नोटीस, सोमय्यांचा दावा; अजित पवारांबद्दल मात्र यू टर्न
शरद पवार, किरीट सोमय्या आणि अजित पवार.
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 4:06 PM

मुंबईः अजित पवारांना अटक होणार, ते जेलमध्ये जाणार असा छातीठोक दावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्यांनी रविवारी आपल्याच विधानावरून यू टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. जेलमध्ये जाणे म्हणजे कारवाई होणे, असा शोध लावत त्यांनी शब्दशः अर्थ घेऊ नका, असे आवाहन केले. मात्र, शरद पवारांच्या दोन निकटवर्तीयांना नोटीस दिल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय शरद पवारांना नेमकी कशाची भीती वाटतेय, असा सवालही सोमय्यांनी केला.

पवारांना भीती कशाची?

ठाकरे सरकार पेट्रोलचे दर कधी कमी करणार आहे, असा सवाल सोमय्यांनी केला. महाराष्ट्रात लिटरमागे 30 रुपये ठाकरे सरकार घेत आहे. दारूवर 0 टक्के कमी करा. मात्र, पेट्रोलवरील 50 टक्के टॅक्स कमी करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी शरद पवारांवरही शरसंधाण साधले. ते म्हणाले, पवारांना एवढे प्रेम अजित पवारांबद्दल उफाळून आले आहे की, अनिल देशमुखांबद्दल. कंपन्यांच्या धाडीनंतर 1 हजार 50 कोटीची रक्कम बाहेर आली आहे. पवारांचा उजवा आणि डावा हात जगदीश कदमांना ईडीनं दोन नोटीस पाठवली आहे. 100 कोटीची वसुली कशी केली, याचा हिशेब राजेंद्र पाटोळे आणि जगदीश कदमांनी दिला आहे. मग पवारांना त्याची भीती आहे का, त्यांना नेमकी कोणाची काळजी आहे, असा सवाल सोमय्यांनी केला.

जेलमध्ये जाणे म्हणजे कारवाई होणे

अजित पवार जेलमध्ये जाणार का, असे विचारले असता सोमय्यांनी यू टर्न घेतला. ते म्हणाले, जेलमध्ये जाणे म्हणजे कारवाई होणे. प्रताप सरनाईक जेलमध्ये गेले नाहीत, पण त्यांची 78 एकर जमीन जप्त झाली ना. आपण शब्दप्रयोग वापरतो. सगळेच जेलमध्ये जात नसतात आणि जेलही टाकत नसते, असे सांगायला ते विसरले नाहीत.

अडसूळ, खोतकरांवरही निशाणा

सोमय्या म्हणाले, चोरी केली नाही तर आनंद अडसूळ का लपून बसलेत. आता मी आणखी एक नाव वाढवत आहे. मी अर्जुन खोतकरांच्या जालना सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढला आहे. खोतकरांनी स्पष्टीकरण दिलेय की त्याचा आणि माझा संबंध काय. मात्र, माझ्याकडे त्याची कागदपत्रे आहेत, असा दावाही त्यांनी केला.

इतर बातम्याः

जरंडेश्वरप्रमाणेच खोतकरांचा घोटाळा, सोमय्यांचा आरोप; नांगरे-पाटलांची पत्नी, सासऱ्यांचेही घेतले नाव, चौकशीच्या मागणीसाठी उद्या दिल्लीला जाणार

Nashik: विद्या असूनही मती गेली, डॉक्टर नववधूच्या Virginity Testचा प्रयत्न, नवरा मर्चंट नेव्हीमध्ये!

Nashik: गोंधळ आख्यानानंतर जिल्ह्यात उद्यापासून सुरू होणार माध्यमिकच्या शाळा, बच्चेकंपनीचा उत्साह शिगेला!

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.