यशोमती ताई फिरल्याचे चालते, मग विरोधी पक्षनेत्यांचे फिरणे भडकावणे कसे; भाजप नेते शेलारांचा सवाल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 21, 2021 | 6:04 PM

मंत्री यशोमती ठाकूर यांना उत्तर देताना शेलार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची भूमिका देवेंद्रजींनी स्पष्ट केली आहे. राडा आणि दंगल होवू नये हे खरे आहे. मात्र, मात्र हिंदूंवर हल्ले होऊ नयेत. हल्लेखोरांवर कारवाई करावी ही मागणी रास्त आहे.

यशोमती ताई फिरल्याचे चालते, मग विरोधी पक्षनेत्यांचे फिरणे भडकावणे कसे; भाजप नेते शेलारांचा सवाल
आशिष शेलार, भाजप नेते.

मुंबईः त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव ही तीन शहरे अचानक पेटली. त्यावरून सुरू झालेला राजकीय वादविवाद काही केल्या थांबायला तयार नाही. रविवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर शरसंधाण साधत देवेंद्र फडणवीसांची जोरदार पाठराखण केली. यशोमती ताई फिरतात, पण विरोधी पक्षनेत्यांचे फिरणे भडकावणे कसे, असा सवाल त्यांनी केला. शिवाय हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणीही केली.

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

अमरावती हिंसेवरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर या घटनेवर मौन का? असा सवालही त्यांनी केला होता. फडणवीसांची ही पत्रकार परिषद होताच यशोमती ठाकूर यांनी मीडियाशी संवाद साधत फडणवीसांच्या आरोपांचं खंडन केले. फडणवीस जबाबदार नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत असे वाटले होते. पण त्यांनी आज बेजाबाबदारपणे विधाने केली. फडणवीसांची एकदोन वक्तव्य आवडले नाही. ते भडकवत असल्यासारखं वाटले. हिंदू-मुस्लिम करू नका. अर्धवट माहिती घेऊन ते बोलत आहेत. त्यांनी पूर्ण अभ्यास करावा. त्याच्या पत्रकार परिषदेवर माझा आक्षेप आहे. 12ची घटना निंदनीय आहे. पण 13 तारखेची घटना त्यापेक्षाही अधिक निंदनीय आहे. दोन्ही आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. महाविकास आघाडी सरकार निष्पक्षपाती भूमिका घेत आहे. ज्यांनी कोणी दंगल भडकवली त्याला सोडलं जाणार नाही. आता अमरावती शांत झाले आहे. कोणीही बाहेरून येऊन आमच्या अमरावतीला भडकावू नका, असे आवाहन ठाकूर यांनी केले.

शेलारांनी दिले उत्तर

ठाकूर यांना उत्तर देताना शेलार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची भूमिका देवेंद्रजींनी स्पष्ट केली आहे. राडा आणि दंगल होवू नये हे खरे आहे. मात्र, मात्र हिंदूंवर हल्ले होऊ नयेत. हल्लेखोरांवर कारवाई करावी ही मागणी रास्त आहे. यशोमती ताई फिरतात. ते चालते. मग विरोधी पक्षनेत्यांचे फिरणे हे भडकावणे कसे, असा सवाल त्यांनी केला. शेलारांनी शिवसेनेवरही टीका केली.

135 कोटींचे ड्रग्ज जप्त

शेलार म्हणाले, मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरात ड्रग्जसंदर्भात 500 केसेस केल्या आहेत. त्यात वर्षभरात 620 आरोपींना अटक केली आहे. 4000 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. पोलिसांनी वर्षभरात एकूण 135 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

इतर बातम्याः

बाब्बो, एकट्या जळगावात 3518 कोटींच्या वीजबिल थकबाकीचा डोंगर; महावितरणचे कंबरडे मोडले!

नाशिकचे दिल्ली होऊ नये म्हणून प्रयत्न, प्रदूषणावर Go Green Cab चा उतारा; महिला उद्योजकांचा अनोखा उपक्रम

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI