AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electricity : राज्याची हरित ऊर्जा क्षेत्रात नवी भरारी, येत्या पाच वर्षात 11 हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार

आगामी चार ते पाच वर्षात अदानी समुह सुमारे 60 हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पांमध्ये करणार आहे. यामुळे 30 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच या पीएसपींच्या माध्यमातून 11 हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या मदतीने वीज निर्मिती वा वीज संचय करणाऱ्या या प्रकल्पांचे अनेक लाभ राज्याला होणार आहेत.

Electricity : राज्याची हरित ऊर्जा क्षेत्रात नवी भरारी, येत्या पाच वर्षात 11 हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार
येत्या पाच वर्षात 11 हजार मेगावॅट वीज निर्मिती होणारImage Credit source: nitin raut
| Edited By: | Updated on: Jun 28, 2022 | 8:15 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा अतिशय महत्वाचा निर्णय राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत (Nitin Raut) यांनी घेतला आहे. येत्या 5 वर्षात राज्यात तब्बल 11 हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. अदानी उद्योग समुहातर्फे ही वीज निर्मिती (Power Generation) केली जाणार आहे. जागतिक आर्थिक परिषदेत 50 हजार कोटींची गुंतवणूक खेचून आणणारे ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी यानंतर अवघ्या महिनाभरात पुन्हा 60 हजार कोटींची गुंतवणूक (Investment) क्षेत्रात आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात 1 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्य सरकारचा ऊर्जा विभाग आणि अदानी ग्रीन एनर्जी समूह (एजीईएल) यांच्यात आज ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण असा सामंजस्य करार करण्यात आला.

ऊर्जा क्षेत्रात नवी उंच भरारी घेणारा निर्णय

अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात व हरित ऊर्जा क्षेत्रात नवी उंच भरारी घेणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी या करारानंतर बोलताना व्यक्त केली. अलिकडेच उन्हाळ्यात जाणवलेली वीज आणि कोळसा टंचाई यामुळे राज्यावर भारनियमनाचे संकट आले होते. मात्र प्रभावी व्यवस्थापन आणि नियोजन यांच्या माध्यमातून राज्य सरकारने राज्यातील भारनियमन टाळण्यात यश मिळविले. या पार्श्वभूमीवर राज्यात अतिरिक्त विजेची उपलब्धता व्हावी म्हणून ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा विभाग प्रयत्नशील आहे.

अदानी समूह 60 हजार कोटींची गुंतवणूक करणार

या करारानुसार अदानी ग्रीन एनर्जी कंपनीतर्फे राज्यात पम्पड स्टोरेज प्रोजेक्टस (पीएसपी – Pumped Storage Projects) उभारले जाणार आहेत. आगामी चार ते पाच वर्षात अदानी समुह सुमारे 60 हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पांमध्ये करणार आहे. यामुळे 30 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच या पीएसपींच्या माध्यमातून 11 हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या मदतीने वीज निर्मिती वा वीज संचय करणाऱ्या या प्रकल्पांचे अनेक लाभ राज्याला होणार आहेत. विशेषतः वीज टंचाईच्या स्थितीत तात्काळ वीज निर्मितीसाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाचे उपसचिव नारायण कराड व अदानी उद्योग समुहाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अजित बारोडिया यांनी प्रतिनिधी म्हणून या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. ऊर्जा विभागाचे उपसचिव नारायण कराड, अवर सचिव नानासाहेब ढाणे, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अजित बारोडिया, असोसिएट वाईस प्रेसिडेंट अक्षय माथुर यावेळी उपस्थित होते. (In the next five years the state will generate 11,000 MW of electricity)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.