इंडिया आघाडीचे दिग्गज एकत्र, शरद पवारांशी बंद दाराआड ४० मिनिटं चर्चा! डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर पवार कोणता पत्ता उघडणार?
मुंबईत इंडिया आघाडीचे दिग्गज एकत्र आले. त्यांची शरद पवारांशी बंद दाराआड ४० मिनिटं चर्चा झाली. आता डिलिमिटेशनवरील बैठकीनंतर पवार अधिवेशनात कोणता पत्ता उघडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

संसदेच्या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक पाडण्यासाठी इंडिया आघाडींच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. इंडियाचे आघाडीचे नेते दुपारी चेन्नईत पोहोचले. चेन्नईत त्यांनी एम के स्टॅलिन यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री मुंबईत शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली. इंडिया आघाडीच्या नेत्यांना बैठकीत नेमकं काय घडलं, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु आता अधिवेशनात शरद पवार हे कोणता पत्ता उघडणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागणार आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांची चेन्नईत बैठक झाली. परंतु एम के स्टॅलिन यांची मनधरणी करण्यास अपयश आलं. त्यानंतर सर्व नेते मुंबईत पोहोचले. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत बैठक केली. शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. ब्रीच कँडी रुग्णालयात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांसोबत ४० मिनिटांच्या चर्चेनंतर इंडिया आघाडीचे नेते विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. बैठकीनंतरही शरद पवारांच्या भूमिकेबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शरद पवार डिलिमिटेशन विधेयकावर काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर शरद पवार नेमकी कोणती भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. शरद पवारांच्या भूमिकेनंतर इंडिया आघाडीच्या पुढील रणनीतीबाबत उत्सुकता लागली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन खासदार राहणार अनुपस्थित
दरम्यान, एका रिपोर्टनुसार, डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आयोजित अधिवेशनात शरद पवार यांच्या पक्षाचे दोन खासदार प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव अनुपस्थित राहणार आहेत. यात स्वतः शरद पवार हे आजारी असल्यामुळे संसदेच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रेही अनुपस्थित राहणार आहेत. सुरेश म्हात्रे हे आजारी असल्यानं अधिवेशनाला अनुपस्थितीत राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे