
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारठा चांगलाच वाढलाय. पारा सातत्याने घसरताना दिसतोय. पुण्यात कडाक्याची थंडी, तापमानात घट झाल्याने पुणेकर अनुभवतायत हुडहुडी भरवणारी गुलाबी थंडी. फक्त पुणेच नाही तर राज्यात अनेक भागात कडाक्याची थंडी पडली असून उत्तरेकडून थंडगार वारे येतंय. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असून पुढील काही दिवसांमध्ये पारा अधिक घसरण्याचा अंदाज आहे. मात्र, कालपासून थंडी थोडीशी कमी झालीये. मुंबई, नागपूर, अकोला, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, आहिल्यानगर, गडचिरोली, गोदिंया, जळगाव, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पारा घसरत आहे. धुळ्यात 7.5 सेल्सिअसपर्यंत पारा घसरला. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला.
गारठा सध्या जाणवत असला तरीही मागच्या दोन ते तीन दिवसांच्या तुलनेत काही भागात गारठा कमी झाला. हेच नाही तर ढगाळ वातावरणही बघायला मिळतंय. सध्या राज्यात पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झालंय. काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा देखील दिलाय. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला.
काही ठिकाणी पारा 10 अंशांच्याखाली आहे. शुक्रवारी धुळे येथे राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 7.5 अंश इतके तापमान नोंदवले गेले. परभणी येथे 8.9 तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, आहिल्यानगर आणि महाबळेश्वर येथे पारा 11 अंशाने खाली आला. आज राज्यातील काही शहरांमध्ये पावसाला पोषक असे वातावरण आहे. हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये होईल.
पुण्यातला पारा हा 10 अंशाच्या खाली गेला. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा पसरला. थंडी वाजू नये यासाठी पुण्यातील सारसबागेतील गणपती बाप्पाला परंपरेनुसार लोकरचा स्वेटर आणि कान टोपी घालण्यात आलीयं. गणपत्ती बाप्पाला देखील थंडी वाजत असेल ही गोड भावना ठेवून हा स्वेटर गणपती बाप्पाला घालण्यात आलाय. प्रत्येक हिवाळ्यात जेंव्हा जेंव्हा थंडी वाढते तेव्हा बप्पाला स्वेटर घातला जातो.