AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर पुन्हा संकट! थंडीसोबतच कोसळधार पाऊस, अलर्ट जारी, मोठा इशारा, पुढील 48 तास अत्यंत…

Maharashtra Weather Update : राज्यात 21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान पावसाचा मोठा इशारा देण्यात आलाय. यासोबतच थंडीच्या लाटेचाही इशारा देण्यात आला. पावसामुळे राज्यातील थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

राज्यावर पुन्हा संकट! थंडीसोबतच कोसळधार पाऊस, अलर्ट जारी, मोठा इशारा, पुढील 48 तास अत्यंत...
warning rain
| Updated on: Nov 21, 2025 | 7:29 AM
Share

राज्यात कडाक्याची थंडी वाढली आहे. उत्तरेकडून थंडी वारे येत असल्याने महाराष्ट्रात गारठा वाढलाय. अनेक शहरांमध्ये सरासरी पेक्षा 5 अंश सेल्सिअसणे किमान तापमानात घसरण झालीये. यासोबतच कमाल तापमानात घसरण होत असल्याने दुपारी वातावरणात गारवा आहे. नाशिक शहरात 9.7 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात कडाक्याच्या थंडीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. नोव्हेंबरची 21 तारीख असून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, बिहार, राजस्थान, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या भागात पारा सातत्याने घसरताना दिसत आहे. हिम लाटेचा इशारा राज्यात असून पुढील दोन ते तीन दिवसात गारठा अधिक वाढणार आहे. अशातच शाळेचा वेळा उशिरा करण्याची मागणी पालकांकडून केली जातंय.

राज्यात गारठा वाढत असतानाच पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला. मध्य महाराष्ट्रात 21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या भागात पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात. पाऊस कोसळल्यानंतर राज्यात थंडीचा कडाका असून वाढू शकतो, असा अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहेत.

धुळे येथे सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. 6.5 अंश तापमान धुळ्यात नोंदवले गेले. निफाडमध्ये 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणीत 8.4 तापमानाची नोंद झाली. नाशिक, भंडारा, आहिल्यानगर येथे पारा खाली गेल्याचे बघायाला मिळाले. पुढील काही दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढणार असल्याचे स्पष्ट आहे. मुंबईमध्येही सकाळच्या वेळी चांगलाच गारठा जाणवत आहे.

बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने अंदमान आणि निकोबार बेटांसाठी अलर्ट जारी केला आहे. 21 नोव्हेंबरपासून हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे समुद्राची परिस्थितीही खवळलेली असण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना 23 नोव्हेंबरपर्यंत अंदमान समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. कुठे पाऊस, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे थेट चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. संपूर्ण देशात वेगवेगळे वातावरण सध्या बघायला मिळतंय.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...