महाराष्ट्रात धो धो पाऊस, बंगालच्या उपसागरात फिरले वारे, 72 तासात वादळी वाऱ्यासह थेट..

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील पाच दिवस राज्यात धो धो पाऊस कोसळेल.

महाराष्ट्रात धो धो पाऊस, बंगालच्या उपसागरात फिरले वारे, 72 तासात वादळी वाऱ्यासह थेट..
Heavy rain maharashtra
| Updated on: Sep 21, 2026 | 7:59 AM

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. यावेळी राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. बऱ्याच भागात दुष्काळाची स्थिती आहे. पिके वाळली आहेत. शेतकरी चिंतेत आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याचा इशारा अगोदरच देण्यात आला. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला. राज्यात धो धो पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. अखेर राज्यात धो धो पाऊस कोसळणार आहे. हवामान तज्ज्ञांनी पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील 72 तास मुसळधार पाऊस कोसणार आहे. भारतीय हवामान विभागाने 22 जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिकी परिसरात ताशी 30-50 किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला.

एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी झाले असून, काही ठिकाणी कमी कालावधीत अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असल्याची कबुली वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे. त्यातच पुन्हा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.

वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पाऊस कोसळत आहे. पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम असेल. ऑगस्ट महिना कोरडा गेला. त्यातच सप्टेंबर महिन्यातही समाधाकारक पाऊस होणार नसल्याचा अंदाज होता. सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यासाठी महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात स्थिती गंभीर आहे. पिके गेली पण जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us