Weather Rain Updates : महाराष्ट्रात धो धो पाऊस, 15 जिल्ह्यात मोठा इशारा, 8 तासात..

Weather Rain Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यातच दुष्काळाचे संकट आहे. भारतीय हवामान विभागाने आज पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला. 13 राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला.

Weather Rain Updates : महाराष्ट्रात धो धो पाऊस, 15 जिल्ह्यात मोठा इशारा, 8 तासात..
Weather Rain Updates
| Updated on: Sep 23, 2026 | 9:13 AM

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाने पाठ फिरवली. शेतकरी राजा चिंतेत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुष्काळ दाैऱ्यावर आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. पिकांचा प्रश्न मोठा आहे. काल रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील 8 तास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशिव, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोदिंया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

यासोबतच कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्हात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. यासोबतच 13 राज्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. पंजाब, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यात पावसाला स्थिती अनुकूल आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील 12 तासात डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 62 किलोमीटर किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकतो. ही चक्रीवादळाच्या अगोदरची पायरी मानली जाते. तब्बल 13 राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हेच नाही तर 75 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 23 ते 24 दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक धरणे कोरडी आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. एल निनोमुळे राज्यात पाऊस कमी झाल्याचे सांगितले जात आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला, ज्याचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाला.दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने पाझर तलाव पडले कोरडे पडले. दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होतेय.नांदणी गावातील पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला पाझर तलाव कोरडा पडल्याने गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us