राज्यात धो धो पाऊस सुरू, हवामान तज्ज्ञांचा मोठा इशारा, पुढील काही तासात..
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची मोठी प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यातच अनेक भागात मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे. धो धो पावसाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांना मोठा दिलासा या पावसाने मिळाला.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेला. दुष्काळाचे मोठे संकट आहे. काही जिल्हात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. त्यातच आता धो धो पाऊस काही राज्यात बघायला मिळतोय. मुसळधार पावसाला काही जिल्ह्यात सुरूवात झाली. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने रत्नागिरीमध्ये सायंकाळच्या दरम्यान आगमन झाले. धो धो पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्यात मुसळधार पाऊस झाला. दोन दिवसानंतर पावसाच्या हजेरीनं शेतकरी सुखावला. हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी मोठा इशारा पावसाचा दिला आहे.
वाशिमच्या मानोरा परिसरात आज सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पुणे गेल्या दोन तासांपासून मेघगर्जनेसह पुण्यात पावसाची दमदार हजेरी लावली. दुष्काळी जत शहराचा परिसरामध्ये पावसाची सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी बघायला मिळाली. सातारा जिल्ह्याला कोरेगाव आणि माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर परिसराला मुसळधार पावसाने झोडपले.
शिखर शिंगणापूर परिसरात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान बघायला मिळतंय. नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जिंती परिसरात पावसाची जोरदार हजेरी, पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. उत्तर पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी लावली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इंदापूरात पावसाची हजेरी लावली. पावसाच्या प्रतीक्षेतील असणाऱ्या शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.
धाराशिव शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. नागरिकांची उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पावसाच्या खंडामुळे सुकलेल्या शेतपिकांची आमदार अंबादास दानवेंकडून पाहणी करण्यात आली. वैजापूर-कन्नड तालुक्यातील खंडाळा, शिऊर आणि कानडगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद.
कोरडा दुष्काळावरून विरोधक आक्रमक, सभागृहात काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांनी नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांचा भारा आणला, शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करीत, घोषणाबाजी केली. पाऊस गायब, खरीप पिकांवर संकट पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, माहूरच्या दिगडीतील शेतकऱ्याचा कपाशीला जगवण्यासाठी बॉटल जुगाड केल्याचे बघायला मिळाले. पूर्ण राज्यात दुष्काळाची स्थिती आहे.
