आजही विश्रांती नाहीच, तो कोसळणारच.. तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, पुढील 24 तासात..

गेल्या काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावत आहे. या पावसामुळे मोठे नुकसान होत आहे. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

आजही विश्रांती नाहीच, तो कोसळणारच.. तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, पुढील 24 तासात..
Rain
| Updated on: Apr 04, 2026 | 7:12 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात सतत पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सर्वांनाच नाकीनऊ आलेत. रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. आज सकाळपासूनच अनेक भागात ढगाळ वातावरण बघायला मिळाले. आजही मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पावसा हजेरी लावण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याचा अंदाज आहे. अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर या भागात आज अवकाळी पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. यादरम्यान विजांचा मोठा कडकडाट देखील बघायला मिळाले.

सतत अवकाळी पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिक गेले. या पावसाचा फटका सर्वांनाच बसत आहे. नांदेड जिल्ह्यात चौथ्या दिवशीही अवकाळणी पाऊस झाला. नांदेड शहरसह अर्धापूर, मुदखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने येलो अलर्ट नांदेड जिल्ह्याकरिता जारी केला होता. पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

अवकाळी पावसामुळे मुरबाड तालुक्यातील फळ पिकांचे मोठे नुकसान. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली जातंय. मुरबाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. टोकावडे, मोरोशी, शिरोशी आणि धसई विभागात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, चिकू सह इतर फळबागांमधील फळ गळून पडले आहेत.

शिरपूर तालुक्यातील अहिल्यापुर शिवारात विज कोसळून दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर शिवारात शेतात झाडाखाली असलेले बैलांवर विज कोसळल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. वादळी वाऱ्यासह पावसाने पिकांचे नुकसान तर होत आहे. मात्र यात शेतकऱ्यांचे जनावरे देखील दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

Follow Us