मुंबईत पहाटेपासून पावसाची जोरदार हजेरी, 30-40 ताशी वेगाने वारे वाहणार, पुढचे 3 तास…
Monsoon Update Mumbai : राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली. मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

अखेर अनेक दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली. या पावसाने रस्त्यावर पाणी साचले. सकाळी कामाला निघालेल्या अनेक जणांची तारांबळ उडाली. आज राज्यभरात पावसाला पोषक वातावरण आहे. मॉन्सून लांबणीवर पडलेला असतानाच दमदार पाऊस सुरू झाले. मुंबई-उपनगरात मान्सूनची हजेरी, कांदिवली ते गोरेगाव पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळत आहे. मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. अखेर मान्सूनने मुंबईसह उपनगरात हजेरी लावली आहे. कांदिवली, मालाड, बोरिवली, गोरेगावसह सर्वच भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली, मालाड, बोरिवली, गोरेगाव परिसरात पाऊस सुरू आहे. मान्सूनच्या आगमनाने मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाची हजेरी
मुंबईत आज सकाळपासूनच हवामानात बदल झाला. दादर आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण सुरूवातीला बघायला मिळाले. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. अनेकजण स्टेशनवरच अडकली. वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पहिल्या दमदार सरींमुळे वातावरणात छान गारवा निर्माण झाला आहे. अखेर मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार तास मुंबईसह उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. यादरम्यान 30-40 ताशी वेगाने वारे असेल.
भारतीय हवामान विभागाने दिला मोठा इशारा
जळगावात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल एक ते दीड तासापर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. अद्याप देखील पेरणी योग्य पावसासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आवाहन
सरकारकडून अगोदरच शेतकऱ्यांना सांगण्यात आले की, जोपर्यंत आवाहन केले जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करणे टाळावे. दमदार पावसानंतरच पेरण्या कराव्यात. यंदा राज्यात पाऊस कमी राहण्याचा इशारा अगोदरच देण्यात आला. एल निनोचा प्रभाव या पावसावर असणार आहे. जगभरात तज्ज्ञांनी एल निनोचा इशारा दिला. एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय देखील झाला. त्याचा परिणाम राज्यातील पावसावर होण्याचा अंदाज आहे.