राज्यावर संकट कायम! आज तो कोसळणारच, तब्बल इतक्या जिल्ह्यात अलर्ट जारी..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहेत. एप्रिल महिन्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला होता.

राज्यावर संकट कायम! आज तो कोसळणारच, तब्बल इतक्या जिल्ह्यात अलर्ट जारी..
Rain
| Updated on: Apr 05, 2026 | 7:18 AM

राज्यातील हवामानात सतत बदल होत आहे. गेल्या आठ दिवसांपेक्षाही अधिक काळापासून राज्यातून अवकाळी पावसाचे सावट दूर होत नाहीये. सतत वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मराठावाड्यासह विदर्भात पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील हवामानात आज चढउतार बघायला मिळेल. काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. गोदिंया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. विजांचा कडकडाटासह पाऊस होईल. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस सतत हजेरी लावत आहे. त्यामध्येच आजही इशारा देण्यात आला. आज अनेक भागात उष्णता वाढण्याचाही अंदाज आहे.

या अवकाळी पावसाचा मोठा फटका थेटपणे शेती पिकांना बसला आहे. रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा अमरावती जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेला कांदा पावसामुळे भिजला शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचे नुकसान. कांद्यासह गहू, संत्रा आदी फळ पिकांचे मोठे नुकसान झाले.

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दुधखेड भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. कांद्याची पीकही जोमदार आले. सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने काढून ठेवलेला कांदा हा उन्हामध्ये वाळवण्यासाठी तसाच शेतात पडून होता. वाळल्यानंतर बाजार समितीत हा कांदा शेतकरी विकण्याच्या तयारीत असताना झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढून ठेवलेला संपूर्ण कांदा हा भिजल्यामुळे खराब झाला.

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा पपईच्या बागांना देखील बसला आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जळगावातील आव्हाने परिसरात पपईच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तीन एकर शेतातील 4000 झाडांपैकी जवळपास 800 ते 1000 पपईचे झाड वादळी वाऱ्यामुळे तुटून जमिनीवर पडली आहेत. वादळी वाऱ्यामुळे पपईचे काही झाड जमीनदोस्त झाले आहे तर काही झाडांवरील पपई हे जमिनीवर पडून मोठे नुकसान झाले आहे.

Follow Us