उन्हाळ्याची चाहूल, रुमाल आणि गॉगल ठेवा जवळ, राज्यातील हवामानात…

राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे पाऊस तर कुठे उन्ह अशी स्थिती आहे. त्यामध्ये भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला असून राज्यात उन्हाळ्याचा चटका अधिक तीव्र होणार आहे.

उन्हाळ्याची चाहूल, रुमाल आणि गॉगल ठेवा जवळ, राज्यातील हवामानात...
Summer
| Updated on: Feb 18, 2026 | 8:55 AM

देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. कुठे पाऊस, थंडी तर कुठे थेट उन्हाळा सुरू झाला. फेब्रुवारी महिन्यात हवामानात मोठा बदल होताना दिसतोय. उत्तरेकडील राज्यात थंडी कायम आहे. मात्र, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही दिवसांपूर्वीच अनेक भागात पाऊस झाला. किमान तापमानात चढउतार बघायला मिळतोय. दुपारच्यावेळी उष्णता जाणवत आहे. हवामान बदलाचा थेट आरोग्यावर परिणाम होत आहे. सकाळच्या वेळी थंडी तर दुपारी उकाडा जाणवत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामध्येच वायू प्रदूषणही कमी होण्याचे नाव घेत नाही. देशातील काही भागात भारतीय हवामान विभागाने थेट पावसाचा इशारा दिला. काही राज्यात पाऊस आहे. उन्हाळा, पाऊस आणि थंडी अशी परिस्थिती आहे.

भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. केरळच्या कोची येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. कोची येथे 36.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अमरावती येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अमरावती येथे 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरियाणातील वातावरण पुन्हा एकदा बदलणार आहे. या राज्यात आता थंडी कमी होताना दिसतंय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, थंडी कमी होत असली तरीही तापमानात चढउतार बघायला मिळेल. यासोबतच काही भागात पावसाचा इशाराही जारी करण्यात आला. सकाळच्या वेळी थंडीसह धुके पडण्याची शक्यता आहे.

18 फेब्रुवारी रोजी पश्चिम उत्तर प्रदेशातील अंदाजे 19 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने या भागात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, पुढील आठवड्यात कमाल तापमान मोठ्या प्रमाणात बदलणार नाही. 3 ते 4 अंशांनी वाढेल आणि नंतर त्यात थोडीशी घट होऊ शकते. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे.

मुंबईत तापमानात चढउतार; कमाल तापमान पस्तिशीखाली. दादर चौपाटी परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण. दुपारी 12 ते 4 दरम्यान उन्हाचा तडाखा कायम. भारतीय हवामान विभाग नुसार 21° किमान, 32° कमाल तापमान.  सोमवारी 35° वरून कमाल तापमानात घट.. तर आज 32° तापमानाची शक्यता गुरुवारपासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज. एकीकडे तापमान चढता उतरता असून दुसरीकडे सलग 20 दिवस मुंबईची हवा ‘खराब’ श्रेणीत

29 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत AQI 151  ते 200 दरम्यान . तर 2 फेब्रुवारी रोजी हा निर्देशांक 199 पर्यंत गेला होता. गेल्या दोन दिवसा पासून 151 इतकी नोंद जी गेल्या 20 दिवसांतील सर्वात कमी असली तरी अजूनही ती ‘खराब’ श्रेणीतच आहे. एकीकडे तापमानात चढउतार, तर दुसरीकडे सलग वीस दिवस ‘खराब’ हवा — अशा दुहेरी परिस्थितीत मुंबईकरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us