IMD weather update : राज्यावर संकट, थेट मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांना अलर्ट…

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला. ऐन दिवाळीच्या काळात गायब असलेली थंडी आता जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे.

IMD weather update : राज्यावर संकट, थेट मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांना अलर्ट...
IMD weather update
| Updated on: Dec 13, 2025 | 7:31 AM

राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडे गारठा वाढला असून पारा सातत्याने घसरताना दिसत आहे. पंजाब, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार उत्तर प्रदेश सर्वच भागात थंडी वाढली आहे. उत्तरेकडून सध्या थंडीगार वारे वाहत आहे. यामुळे राज्यातील थंडीत झपाट्याने वाढ झाली. पुढील काही दिवस थंडी वाढणार आहे. हेच नाही तर भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला. सकाळच्या वेळी सर्वत्र  धुके बघायला मिळत आहे. मराठवाड्यासह विदर्भात थंडी वाढली आहे. संपूर्ण डिसेंबर महिना थंडी असणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शाळेच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून शाळा भरण्याची वेळ पुढे ढकलण्यात आली.

पुणे, मुंबई, नाशिकमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून शीत लहरी येत आहेत, ज्यामुळे गारठा अधिक वाढत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमध्ये मोठी वाढ होईल आणि राज्यातील हुडहुडी कायम राहिल. राज्यात जेऊरमध्ये नीचांकी तापमानाची नोंद झाली. 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सकाळी पूर्णपणे धुके पसरले होते.

परभणीत 5.5 अंश तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 5.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली. आहिल्यानगर, नाशिक येथे 8 पेक्षाही कमी अंश तापमान होते. वाशिम, सातारा, भंडारा, गोदिंया, नागपूर येथे 10 अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यातील बहुतांश भागात थंडी वाढताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे.

सायंकाळीच थंडी जाणवत आहे. उत्तर भारतात जरी थंडीचा कडाका असला तरीही केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील देखील नोव्हेंबरच्या सुरूवातीला पाऊस होता. आता पूर्ण डिसेंबर महिना थंडी कायम राहणार आहे. थंडी वाढल्याने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली. थंडी, खोकला आणि तापीच्या रूग्णात मोठी वाढ झाली आहे.