
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. थंडी, पाऊस आणि उकाडा या तिन्ही गोष्टी सुरू आहेत. वर्षाच्या सुरूवातीच्या पहिल्याच दिवसी जोरदार पाऊस झाला. त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी होती. उत्तरकेडून थंडी वाढताना दिसत आहे. उत्तरेकडील राज्यात भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज दिला असून पुढील काही दिवसात तापमानात घट होईल. उत्तरेकडे जरी कडाक्याची थंडी असली तरीही राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळत आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण आहे. राज्यातील बऱ्यापैकी थंडी गायब झाली. थंडी जरी गायब झाली असली तरीही वायू प्रदूषण काही कमी होत नाही. मुंबई, पुणे आणि दिल्लीत प्रचंड वायू प्रदूषण वाढलंय. मुंबईमध्ये सायंकाळच्या वेळी आकाशात अंधूक दिसते. वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
पुणे शहर परिसरात उन्हाचा पारा वाढल्याचे सध्या चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली असून थंडीचा जोर ओसरला आहे शहर आणि परिसरात रात्री आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर मात्र उन्हाचा पारा अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे काही भागात दमट वातावरणाची अनुभुती नागरिकांना येत आहे. सतत वातावरणात बदल होत आहे.
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
हरियाणाच्या नर्नुल भागाता देशातील सर्वात नीचांका तापमानाची नोंद झाली. 3.0 अंश सेल्सिअस तापमान नर्नूल येथे नोंदवले गेले. राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली. धुळ्यात 8.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. परभणी येथे 10 अंश सेल्सिअस तापमान होते. बाकी आजही राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल.
22-23 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हलक्या पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारसह उत्तर भारताच्या बहुतेक भागांमध्ये, राजधानी दिल्लीतही तीव्र थंडीची लाट पसरली आहे. सकाळच्या वेळी दाट धुक्यामुळे अनेक भागात स्थिती गंभीर होत असून वाहने चालणे देखील कठीण झाले. पुढील काही दिवसांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र होण्याच शक्यता आहे.