11, 12 आणि 13 जानेवारीला वादळी वाऱ्यासह पाऊस, तब्बल 5 राज्य संकटात, पुढील 72 तास…

Maharashtra Weather Update : कधी पाऊस तर कधी थंडी अशी परिस्थिती सध्या हवामानाची आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला आहे. राज्यात हवामानाची स्थिती नेमकी काय असणार ते जाणून घ्या.

11, 12 आणि 13 जानेवारीला वादळी वाऱ्यासह पाऊस, तब्बल 5 राज्य संकटात, पुढील 72 तास...
Maharashtra Weather
| Updated on: Jan 11, 2026 | 7:33 AM

राज्यासह देशात तापमान सातत्याने बदलताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती सध्या आहे. बदलत्या वातावरणाताचा परिणाम आरोग्यावर होतोय. आरोग्याच्य असंख्य समस्याही निर्माण होत आहेत. वायू प्रदूषणाचा प्रचंड वाढ झाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी सध्या पडली आहे. मात्र, असे असले तरीही राज्यात थंडी कमी झाल्याचे चित्र आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पारा सतत घसरत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदानुसार, पुढील काही दिवस अजून कडाक्याची थंडी असेल. मात्र, असे असले तरीही उत्तरेकडे पडलेल्या थंडीच्या तुलनेत राज्यात येणाऱ्या शीत लहरी कमी असल्याने म्हणावा तसा गारठा जाणवत नाहीये. शिवाय 1 तारखेला झालेल्या पावसानंतर किमान तापमानात वाढ होत आहे. जानेवारी महिना राज्यात थंडी कायम राहणार असल्याचे सांगितले जाते.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मागील तीन दिवसांपासून किमान तापमान 10°c च्या खाली नोंदविण्यात येत आहे. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याची शक्यता आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच तापमान 5 सेल्सिअसपर्यंत खाली जाताना दिसले.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस हवामानात चढउतार बघायला मिळेल. अमृतसरमध्ये देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून तिथे 1.3 तापमान नोंदवले गेले. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली असून धुळ्यात 6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. परभणीमध्ये 6.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जळगाव, मालेगाव, नाशिक, गोदिंया, भंडारा, नागपूर येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामानात चढउतार होत असलातरीही राज्यात गारठा कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात राज्यातही थंडीचा लाट येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचया 72 तासांत बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तामिळनाडूसह दक्षिण भारतातील सुमारे पाच राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल.