पुढील 3 तास संकटाची, प्रशासनाचा इशारा, आजही गारपिटीचा धोका, दुपारी 12 ते 3…

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. उष्णता प्रचंड वाढली आहे. कुठे गारपिट होत आहे. त्यामध्येच हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा जारी केला.

पुढील 3 तास संकटाची, प्रशासनाचा इशारा, आजही गारपिटीचा धोका, दुपारी 12 ते 3...
Alert
| Updated on: Apr 24, 2026 | 7:13 AM

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. काही भागात उन्हाचा चटका वाढला, काही ठिकाणी अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. भारतीय हवामान विभागाने आज कोकण आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला. दुसरीकडे मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला. पुढील 3 तासात जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला.  गेल्या काही तासांपासून हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच पावसासह थेट उष्णतेचाही येलो अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळलेले फायदेशीर.

पुढील काही तास राज्यासाठी धोकादायक असणार आहेत. मुसळधार पाऊस गारपिटीसह होण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व सावंतवाडी तालुक्यात आज प्रचंड गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सह्याद्री पट्ट्यात प्रचंड गडगडाट पाहायला मिळाला. तर कुडाळ तालुक्यातील आंबेरी व मोरे गावातील परिसरात गारांचा पाऊस पडला. तब्बल अर्धा तास या भागात गारा पडत होत्या.

चिपळूणमध्ये अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल जाणवत होते आणि उष्णतेत मोठी वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर अचानक अवघ्या दहा मिनिटांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कमालीचा वाढला असून पुढील दोन दिवस हवामानाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 24 आणि 25 एप्रिलला तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाने नागरिकांचे हाल सुरू झाले. उष्णतेचा पारा 42 ते 43 अंश सेल्सअसपर्यंत पोहोचल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. उष्माघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीची उपाययोजना करत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये एकूण 18 अत्याधुनिक उष्माघात कक्ष उभारण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि तालुका स्तरावरील रुग्णालयांमध्ये हे कक्ष कार्यान्वित करण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us