सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. आज राज्यातील हवामानात बदल होताना दिसले. उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
heat alert
| Updated on: Apr 10, 2026 | 6:31 AM

राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने एकीकडे पावसाचा इशारा दिला तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आहे. या पावसाने थैमान घातले. गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. आजही राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण आहे. कोकणात दमट आणि उष्ण हवामानाचा मोठा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाकडून कोकणात उष्णतेचा दमट अलर्ट जारी करण्यात आला. मराठवाड्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. मुंबई, रायगड, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.

उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. लातूर, धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमधील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यातील पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. सतत पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, या सततच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. कोकणात उष्णतेचा इशारा देण्यात आल्याने दुपारी 12 ते 4 नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे.

जालन्यात मागील काही दिवसात अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकाला झोडपले. यामध्ये गहू पिकाचे भिजल्याने नुकसान झाले. शिवाय काही शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या धास्तीमुळे आधीच आपला गहू काढून घेतला त्यामुळे दरात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 3 हजार रुपये क्विंटल वरून गव्हाचे दर थेट अडीच हजार ते 2700 रुपये क्विंटल झाले. यामुळे शेतकऱ्याला मोठा फटका बसलाय.

दरम्यान दर घसरल्यामुळे उत्पादन खर्च वसूल होणार का अशी चिंता शेतकऱ्यांना लागली. येवला तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी माधव गाडे यांनी वांग्याला अत्यल्प दर मिळत असल्याने एक एकर उभं वांग्याचं पीक तोडून फेकून दिलं . बाजारात वांग्याला केवळ 1 ते 1,5 रुपये प्रति किलो दर मिळत असल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची त्यांची व्यथा आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. आंब्यालाही यंदाच्या पावसाचा मोठा फटका बसला.

Follow Us