
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळतंय. आज भारतीय हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रात्रीही पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. सकाळी देखील पावसाची संततधार सुरू असल्याचे बघायला मिळाले. मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात आज पावसाचा इशारा देण्यात आलाय. देशातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा कहर सुरू आहे. आता याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. आंध्रप्रदेश, गोवा, ओडिसा, आसाम, मेघालय, राजस्थान, गुजरात, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये मोठा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नांदेडमध्येही अतिमुसळधार पावसामुळे काही रस्ते बंद करण्यात आली होती. नांदेडमधील उमरखेड महागाव तालुक्यातील शाळांना सुट्टी काल झालेल्या मुसळधार पाऊस आणि आज हवामान विभागाने वर्तविलेल्या पावसाच्या अंदाज नुसार देण्यात आली आहे. उमरखेड महागाव तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयाना सुट्टी प्रशासनाने जाहीर केली.
मुसळधार पावसाचा इशारा असल्याने वसमत विभागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. वसमत उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी ही माहिती दिली. परळीसह सतरा गावांना पाणी पुरवणारे नागापूर धरण ओव्हर फ्लो झाले आहे. परळी तालुक्यातील नागापूर धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे परळी सिंहासह 17 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून परळी तालुक्यात दमदार पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील प्रकल्प बंधारे तलाव वसांडून वाहत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात काल आलेल्या पावसामुळे पुजारीटोला धरणाच्यां पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणाचे 8 दरवाजे 1 फूट उंचीले सुरू करण्यात आले. यामधून 6359.14 कयुसेक पाण्याच्या विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे . तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्वांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे. तेलंगाना राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे श्रीपादम व येल्लंमपल्ली या दोन धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. तेलंगणा सरकारने महाराष्ट्र सीमावरती भागातील गावांना अलर्टचा इशारा दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा व अहेरी या दोन तालुक्यांना अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घ्यावी असा आव्हान करण्यात आले आहे.