AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण, संजय गायकवाड यांना पहिला मोठा दणका

मोठी बातमी समोर येत आहे, संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये असलेल्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती, आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.

मोठी बातमी! आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण, संजय गायकवाड यांना पहिला मोठा दणका
| Updated on: Jul 11, 2025 | 4:08 PM
Share

मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. खराब जेवण दिल्याचा आरोप करत त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून सुरू होती.

आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमदार संजय गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  समाजमाध्यमातील व्हिडिओ आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीच्या आधारावर अदलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान आता  या गुन्ह्याची माहिती पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना कळवली जाणार आहे. सेक्शन ३५२, ११५ (२) अंतर्गत एनसी दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आता या प्रकरणावर गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले गायकवाड? 

कुणी सभागृहात मुद्दा उपस्थित केला, तर मुख्यमंत्र्यांना विधानसभेच्या नियमाप्रमाणे बोलावं लागतं . त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं,  आम्ही काय फार मोठे काम केले नाही, की ज्यामुळे सरकार अडचणीत येईल. अशा अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना फिर्यादी होता येत नाही.  विरोधकांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी ते करायला सांगितलं असेल. मला पश्चाताप नाही . शिंदे साहेब मला फोनवर बोलले, राग कट्रोल करण्याचा सल्ला त्यांनी मला दिला असं यावेळी गायकवाड यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

मंगळवारी आमदार निवासमधील कॅन्टीनमध्ये जोरदार राडा झाला होता, संजय गायकवाड यांनी जेवनाची ऑर्डर दिली होती, मात्र त्यातील दाळीला वास येत होता, भात शिळा होता असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली.

Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...