
इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचा काही दिवसांपूर्वीच साहिल चिलप याच्यासोबत शाही थाटात साखरपुडा झाला. या साखरपुड्याला तब्बल साडेतीन हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. अत्यंत थाटामाटात महाराजांच्या लेकीचा साखरपुडा झाला. प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले. महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यात मोठ्या पैशांची उधळण केली. दुसऱ्यांना लग्न साधी केल्यानेही मुले होतात, असे सांगणारे महाराज लेकीच्या साखरपुड्यात काही गोष्टी विसरल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. आजकाल लग्नात मुली डान्स करत कार्यालयात दाखल होतात. त्यावरून काही दिवसांपूर्वीच महाराजांनी मोठी टीका केली. मात्र, त्यांची स्वत:चीच लेक कार्यालयात मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन सनरूफमधून बाहेर येत डान्स करताना दिसली.
महाराजांनी ज्याप्रकारे लेकीचा साखरपुडा केला त्यानंतर ते टीकेचे धनी ठरले आहेत. सर्वचस्तरातून त्यांच्यावर टीका होताना दिसतंय. मात्र, टीकेला भीक न घालता महाराजांनी ओपन चॅलेंज देत स्पष्ट शब्दात सांगितले की, साखरपुड्यापेक्षाही जबरदस्त आणि मोठे लग्न करतो. इंदुरीकर महाराजांनी म्हटले की, माझ्यापर्यंत ठीक आहे पण आता गोष्टी माझ्या कुटुंबापर्यंत जात आहेत. माझ्या मुलीच्या कपड्यांबद्दल बोलले आहेत, सहन करण्यापलीकडच्या गोष्टी आहेत.
मुलीच्या कपड्याबद्दल बोलल्याने मोठा संताप इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केला. यादरम्यानच त्यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये इंदुरीकर महाराज मुलींच्या कपड्यांवर बोलताना दिसत आहेत. स्वत:च्या लेकीच्या कपड्यांवर बोलले की, महाराजांना राग येतो… काही दिवसांपूर्वी तेच दुसऱ्यांच्या लेकींच्या कपड्यांवर टीका करत होतो. स्वत:वर आले की, सहन नाही होतंय महाराजांना असे काही लोकांनी म्हटले.
इंदुरीकर महाराज व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत की, तुम्हाला आम्ही कपड्यांवरून बोलले तर तुम्हाला राग येतो… केसांवरून बोलले तर तुम्हाला राग येतो… तुम्हाला सध्या 50 टक्के जागा असल्याने तुम्ही काहीही करू शकता. आपण जर म्हटले की, महिलांनी कपडे चांगले घालावेत तर लोक म्हणतात महाराज लोक महिलांना बोलतात. आपण जर म्हटलं पोरींनी पोरांचे कपडे घालू नये, तर माणस म्हणतात देशात लोकशाही आहे. आपण जर म्हटल मुलीनी आई वडिलांची इज्जत घालू नये तर ती म्हणते प्रेमाला स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुमच्याबद्दल बोलणे म्हणजे हाताने *** मारून घेणे.. म्हणून तुम्हाला जसे वागता येईल तसे… वागा… पण तुमची जिरणार हे ध्यानात ठेवा, असे इंदुरीकर महाराज व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.