Eknath Shinde : लता दीदींच्या जयंती दिनीच आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय होणार सुरु, बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या काय आहेत सूचना?

जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. अपुऱ्या जागेचे कारण न देता आहे त्यामध्ये संगीत महाविद्यालय सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मात्र, लता दीदींच्या जयंतीचे मुहूर्त साधण्याचे त्यांनी सांगितले आहे.

Eknath Shinde : लता दीदींच्या जयंती दिनीच आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय होणार सुरु, बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या काय आहेत सूचना?
लता मंगेशकर
राजेंद्र खराडे

|

Aug 16, 2022 | 6:26 PM

मुंबई : 28 सप्टेंबर या लता दीदींच्या जयंतीचे औचित्य साधून (International Music College) आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करावे अशा सूचना (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. 16 व्या भारतरत्न दिवंगत (Lata Mangeshkar) लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे 28 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्याने पदविका आणि पदवी कोर्स सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीने सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

जागेच्या प्रश्नाचे कारण नको

जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. अपुऱ्या जागेचे कारण न देता आहे त्यामध्ये संगीत महाविद्यालय सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मात्र, लता दीदींच्या जयंतीचे मुहूर्त साधण्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, समितीचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच महाविद्यालय

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा असून त्याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. या समितीने यावर्षी सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा अहवाल लवकर सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

जयंती दिवशीच होणार पहिली बॅच सुरु

संगीत महाविद्यालय सुरू करण्यास जागे अभावी अडचण येऊ नये म्हणून पु.ल.देशपांडे कला अकादमी मध्ये तात्पुरते महाविद्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 28 सप्टेंबर रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंती आहे यानिमित्त यावर्षी पहिली बॅच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें