AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेश सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची चौकशी करा; पंतप्रधान दबावाखाली काम करतात, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

ऑपरेश सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची चौकशी करा; पंतप्रधान दबावाखाली काम करतात, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल
Prithviraj ChavanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 13, 2026 | 8:45 PM
Share

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  देशाच्या अर्थव्यवस्थेचे सगळे खोटे आकडे देण्यात आले आहेत,  देश अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चौथ्या क्रमांकावर होता, आता सहाव्या क्रमांकावर गेला आहे.  विकसित देशाची व्याख्या काय आहे ? हे पंतप्रधान मोदी यांनी सांगावं? असा सवाल यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  सगळे बोगस आणि खोटे आकडे आहेत,  शेती विस्कळीत झाली आहे. ऑपरेश सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दबावाखाली काम करत आहेत,  काल अमेरेकेने भारताच्या जहजावर हल्ला केला आणि त्यात 3 जण मारले गेले. आपण विचारलं पण नाही, पाऊस पडला नाही तर गंभीर स्थिती निर्माण होईल, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत महाराष्ट्र पॅटर्न राबवला जात आहे.  काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो याला विरोध करत आहे, असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोटभर भोजन, डोक्यावर छत सर्वांना मिळावी ही अपेक्षा आहे.  मात्र सध्या मूठभर लोकांनाच फायदा मिळत आहे.  आपल्याला आता दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामसाठी लढाईची तयारी करावी लागेल, काही चुकीचं दिसत असेल तर आंदोलन करण्यात आपण कमी पडत आहोत. एपस्टीन फाईल्समध्ये काय आहे ? त्याची माहिती असणारा एकच माणूस आहेत ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. संपूर्ण में महिना मी रस्स्त्यावर होतो.  मोर्चे आंदोलन असे अनेक कार्यक्रमात सहभागी झालो.  500 रुपयांची नोट गायब झालेली आहे.  चलन तुटवडा झालेला आहे, पैसे चलनामध्ये उपलब्ध नाही, असमतोल निर्माण झाला आहे, असं यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

यशवंत सिन्हांचा निशाणा 

दरम्यान यशवंत सिन्हा यांनी देखील भाजपवर हल्लाबोल करत आता काँग्रेसवर मोठी जबाबदारी आली असल्याचं म्हटलं आहे. देशाला या संकटातून काँग्रेसने वाचवायला पाहिजे. त्यासाठी एकमात्र रस्ता म्हणजे आता रस्त्यावर उतरायला हवे. लाठी काठी खाण्याची आणि जेलमध्ये जाण्याची तयारी देखील त्यासाठी ठेवावी. वर्तमान सरकार देशाला या संकटातून बाहेर काढू शकत नाही, त्यासाठी मोदी मस्ट गो, जेवढं लवकर शक्य आहे, तेवढं, असं सिन्हा यांनी म्हटलं आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार