मोठी बातमी! सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत की नाहीत? राष्ट्रवादीकडून पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाच्या चर्चांदरम्यान पक्षाने पत्रकार परिषद घेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांबाबत मोठं स्पष्टीकरण दिलं. रोहित पवारांवरही गंभीर आरोप करण्यात आले.

मोठी बातमी! सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत की नाहीत? राष्ट्रवादीकडून पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा
Sunil Tatkare
Image Credit source: Google
| Updated on: May 16, 2026 | 4:51 PM

गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सुनेत्रा पवार आणि अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याचीही माहिती समोर आली आहे. राष्ट्र्वादीने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नसल्याचे समोर आले होते. तसेच काही नेत्यांना दिल्लीच्या पक्ष कार्यालयात प्रवेश दिला जात नसल्याचेही समोर आले होते. या सर्व प्रकरणावर आणि आमदार रोहित पवार यांच्या आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना कार्यालयात प्रवेश नाही?

अविनाश आदिक यांनी म्हटले की, ‘मी पक्षाचा राष्ट्रीय सचिव आहेस त्यामुळे मी गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीला जातो आणि पक्षाच्या कार्यालयच काम सांभाळतो. पण गेले काही आठवडे मी गेलो नव्हतो, काल मी दिल्लीतील पक्षकार्यालयात गेलो होतो. काल माझ्या नावाने एका वृत्तपत्राने एक बातमी दिली होती की, मी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना दिल्लीच्या पक्षाच्या कार्यालयात बंदी घातली आहे. पण यासंदर्भात असं काही नाही, माझ्या विरोधात काही लोकांनी हे केल आहे. त्यामुळे ज्या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे, त्यासंदर्भात आम्ही कायदेशीर बाब तपासून आम्ही अब्रूनुकसानीचा दावा करणार आहोत.’

सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत की नाहीत?

उमेश पाटील यांनी सांगितले की, ‘एका वृत्तपत्रात पक्षाच्या संदर्भातील चुकीच्या संदर्भात बातम्या आल्या होत्या. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते राहणार आहेत. प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष आहेत आणि कायम राहणार आहेत याची नोंद पत्रकारांनी घ्यावी. पक्षाची राष्ट्रीय कमिटी आत्ता जाहीर झाली आहे त्यामुळे पक्षामध्ये काही बदल करायचे असतील तर तो निर्णय राष्ट्रीय कमिटी घेणार आहे.’

रोहित पवारांवर गंभीर आरोप

आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करताना उमेश पाटील यांनी म्हटले की, ‘रोहित पवार हे अजित पवार यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांचा सर्वात जास्त छळ करण्याचा प्रयत्न हा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. बारामतीवर रोहित पवार यांचा डोळा आहे आणि बारामती ही अजित पवार यांची राजधानी होती.’

‘अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात चौकशी च्या संदर्भात आमदार रोहित पवार हे ढोल बडवून सांगत आहेत. अजित पवार यांची लीगसी खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांच्या पक्षाची चिंता आमदार रोहित पवार यांनी करू नये. तुमच्या पक्षातील सर्व आमदार आणि खासदार आमच्या पक्षात येण्यास तयार आहेत पण आम्ही आतापर्यंत आम्ही हा निर्णय घेतला नाही आहे.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us